आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
चंद्राला गंज चढू लागलाय...हाेय, हे सत्य आहे. अंतराळात आपल्या शेजारी असलेल्या चंद्राच्या पृष्ठभागावर गंज चढत असल्याचे डागही दिसू लागलेत. हे डाग आॅक्सिडाइज्ड आयर्न (लाेह) याचा अंश असलेल्या हेमेटाइटचे आहेत. पृथ्वीवर हे खनिज माेठ्या प्रमाणात आढळून येते. म्हणूनच चंद्राच्या पृष्ठभागावर या खनिजाचे अंश आढळले. ही संशाेधकांसाठी धक्कादायक गाेष्ट आहे.
वास्तविक लाेखंडाची गंजण्याच्या प्रक्रिया हवा आणि पाण्याशिवाय हाेऊ शकत नाही. या दाेन्ही गाेष्टी असल्या तरच आर्द्रतेमधून त्याला गंज लागू शकताे. आॅक्सिडेशनसाठी आवश्यक हवा चंद्रावर आढळून येत नाही. पाणी देखील उपलब्ध नाही. चंद्रावर संशाेधकांना बर्फाचे अस्तित्व आढळून आले आहे. परंतु, त्याद्वारे पृष्ठभागावर हेमेटाइट अस्तित्वात येणे अशक्य असल्याचे मानले जाते. ‘सायन्स अॅडव्हान्सेस’ मध्ये प्रकाशित युनिव्हर्सिटी आॅफ हवाईच्या शाेध प्रबंधानुसार चंद्राच्या पृष्ठभागावर हेमेटाइटचा शाेध भारतीय चांद्रयान-१ आॅर्बिटरने घेतलेल्या छायाचित्रातून लागला आहे. हवाई विद्यापीठात प्लॅनेटरी सायन्सच्या तज्ञ शुआई ली म्हणाल्या, पृथ्वीचा हा उपग्रह सतत साैर वाऱ्यांचा मार झेलताे.
साैर वाऱ्यांसाेबत हायड्राेजनचे अणू पृष्ठभागावर इलेक्ट्राॅन साेडतात. इलेक्ट्राॅनची कमतरता असेल तरच गंजण्याची प्रक्रिया घडून येते. त्यातही चंद्राचा पृथ्वीजवळ असलेल्या भागावरच हा गंजलेला प्रदेश दिसताे. त्यामुळे चंद्राच्या पृष्ठभागावर हेमेटाइट तयार हाेण्यासाठी पूरक वातावरण नाही. म्हणूनच संशाेधकांसाठी ही गाेष्ट चकीत करणारी ठरली.
परिवर्तनाची ही तीन मुख्य कारणे शक्य
चंद्रावर गंजण्याची चिन्हे बर्फाचा साठा जास्त असलेल्या भागात दिसून आली आहेत. उल्का धडकल्याने चंद्राच्या पृष्ठभागाखालील बर्फ वितळला आणि पृष्ठभागावर जमा झाला. त्यातून सूक्ष्म पाण्याचे कण निर्माण झाले. पृथ्वीच्या वायू मंडलातील आॅक्सिजन साैर वाऱ्यासाेबत चंद्रापर्यंत पाेहाेचतात. त्यामुळे चंद्राच्या पृष्ठभागावर आॅक्सिजनचे कण पाेहाेचल्याने गंजण्याची प्रक्रिया सुरू हाेऊ शकते. सूर्य व चंद्रादरम्यान पृथ्वी येते. त्यातून चंद्रापर्यंत साैर वारे पाेहाेचू शकत नाही. हायड्राेजनच्या स्फाेटांपासूनही चंद्राचे संरक्षण हाेते. याच काळात आयर्न आॅक्सिडेशन हाेऊ शकते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.