आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Screening Of Every Second Person In The UAE, 90% Of Patients Free From Corona ; Ideal While Fighting Kareena

ग्राउंड रिपोर्ट:यूएईमध्ये प्रत्येक दुसऱ्या व्यक्तीची तपासणी, 90% रुग्ण काेराेनामुक्त; काेराेनाशी लढताना मांडला आदर्श

दुबईहून भास्करसाठी क्लेअर मॅल्कमएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
अबुधाबीत लोक स्वयंशासन ठेवून नियम पाळताहेत. - Divya Marathi
अबुधाबीत लोक स्वयंशासन ठेवून नियम पाळताहेत.
  • आर्थिक मोर्चा: जूनपासून अर्थव्यवस्था रुळावर

संयुक्त अरब अमिरातने (यूएई) काेराेना संकटाचा कठाेरपणे सामना केला. ९८.९ लाख लाेकसंख्येच्या देशात २९ जानेवारीला काेराेनाचा पहिला रुग्ण आढळून आला हाेता. हा रुग्ण चीनहून सुट्या साजऱ्या करून कुटुंबात परतला हाेता. त्यानंतर सरकारने तपासणीचा धडाकाच लावला. म्हणून आतापर्यंत ५५ लाख लाेकांची तपासणी झाली. अर्थात प्रत्येक दुसऱ्या व्यक्तीची तपासणी झाली आहे. या धडक कार्यक्रमामुळे काेराेना रुग्णांची माहिती मिळाली. रुग्णांवर वेळीच उपचार हाेत गेले. लाॅकडाऊन, रात्रीची संचारबंदी, आंतरराष्ट्रीय उड्डाणांना मनाई, शाळा-महाविद्यालयात वर्षभरासाठी ऑनलाइन शिक्षण, सॅनिटायझेशन माेहीम इत्यादी गाेष्टींची काेराेना राेखण्यात महत्त्वाची भूमिका राहिली. यूएईमध्ये ५७ हजार १९३ म्हणजेच ९० टक्के काेराेना रुग्ण बरे हाेऊन घरी परतले. येथे आतापर्यंत ६३ हजार २१२ रुग्ण आढळले. त्यापैकी ३५८ जणांचा मृत्यू झाला. यूएईमध्ये व्यापक प्रमाणात तपासणीची सुरुवात दुबईतून झाली. सरकारने ‘गाे सेफ’ माेहीम चालवली. सार्वजनिक ठिकाणांवर काेविड-१९ सेंटर तयार केले. परदेशी यात्रेकरूंसाठी विमानतळावरच तपासणीची सुविधा निर्माण केली. निगेटिव्ह अहवाल आलेल्यांना देशात सर्वत्र पर्यटनाची परवानगी देण्यात आली. सुमारे १५० हाॅटेलला काेविड सेफ असा दर्जा दिला. त्यामुळे परदेशी पर्यटक या हाॅटेलांत बिनधास्तपणे राहू शकतात. हाॅटेलचे जाणकार पाल ब्रिजर म्हणाले, वर्ल्ड ट्रेड काैन्सिलने दुबईला पर्यटनाच्या दृष्टीन सुरक्षित शहराचा दर्जा दिला. दुबई टुरिझमने ‘रेडी व्हेन यू आर’ अभियान चालवले. त्याचा उद्देश परदेशी पर्यटकांना ‘दुबई तुमच्या स्वागतासाठी तयार आहे’ असा आहे. नाेव्हेंबरमध्ये ‘सिटी स्कॅप ग्लाेबल’ प्राॅपर्टी शाे दुबईत हाेणार आहे. पर्यटन क्षेत्राचे यूएईच्या जीडीपीमध्ये ११.१ टक्के याेगदान आहे. काेराेना संकटाचा या क्षेत्रावर सर्वात जास्त परिणाम झाला आहे. एक्स्पाे २०२० दुबई संपूर्ण वर्षासाठी स्थगित करण्यात आले. आता सरकारने यूएईचा व्हिसा असलेल्या २ लाख परदेशींना परतण्यास मंजुरी दिली. हे लाेक काेराेनामुळे इतर देशांत अडकून पडले.

आर्थिक मोर्चा: जूनपासून अर्थव्यवस्था रुळावर

यूएईच्या सेंट्रल बँकेच्या म्हणण्यानुसार देशाच्या अर्थव्यवस्थेचा ३.६ टक्क्यांनी संकोच होईल. त्यामुळे यंदा तिसऱ्या तिमाहीत रोजगार झपाट्याने कोसळतील. त्याचा मुकाबला करण्यासाठी सरकारने सुमारे २ लाख कोटी रुपयांची आर्थिक मदत दिली. देशात क्रयशक्ती व्यवस्थापन निर्देशांक अर्थव्यवस्थेच्या गतीचा निकष आहे. जूनमध्ये हा निर्देशांक ५०.४ आहे. परंतु २०२० च्या पहिल्या सहा महिन्यांत अर्थव्यवस्था रुळावर येत आहे. अर्थतज्ञ डेव्हिड आेव्हन म्हणाले, बहुतांश कंपन्यांकडे गेल्या १० महिन्यांच्या तुलनेत जास्त मागणीत वाढ झाली. दरम्यान, मिडल ईस्ट कौन्सिल ऑफ शॉपिंग सेंटरचे सीईआे डेव्हिड मॅक्डम म्हणाले, रिटेल क्षेत्रात २० ते ८० टक्क्यांपर्यंत घसरण पाहायला मिळाली.

बातम्या आणखी आहेत...