आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासागराच्या आतही साखरेचा मोठा स्रोत उपलब्ध आहे. सागरी गवताच्या रूपातील या स्रोतात सुक्रोज असते. ते स्वयंपाकघरातील साखरेचा मुख्य घटक आहे. सागराच्या तळाशी असलेल्या सागरी गवतात १३ लाख टन साखरेचा साठा आहे. म्हणजेच ३२ अब्ज शीतपेयांच्या गोडव्याइतका. नुकत्याच जर्मनीतील मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट फॉर मरीन मायक्रोबायलॉजीमध्ये झालेल्या एका संशोधनातून हे समोर आले. सागरी सूक्ष्म जीवशास्त्रज्ञ निकोल डुबिलियर सांगतात, सागरी गवत प्रकाश संश्लेषणावेळी साखरेचे उत्पादन करते.
संशोधकांनी पाण्यातील सागरी गवताच्या मैदानात मास स्पेक्ट्रोमेट्री तंत्रज्ञाच्या माध्यमातून आपल्या गृहितकाचे परीक्षण केले. यात कळाले की, सरासरी प्रकाशात हे सागरी गवत स्वत:च्या मेटाबॉलिझमसाठी सुक्रोझचा वापर करते, परंतु दुपारी किंवा उन्हाळ्यातील उच्च प्रकाशात ही वनस्पती साखरेचे उत्पादन करते. नंतर ती अतिरिक्त सुक्रोज आपल्या रायझोस्फीयरमध्ये सोडते. आश्चर्य म्हणजे ही अतिरिक्त साखर आसपासच्या वातावरणात सूक्ष्म जिवांकडून शोषून घेतली जात नाही. यास रोखण्यासाठी सागरी गवत फेनोलिक कंपाउंड इतर गवताप्रमाणेच पाठवते. हे केमिकल कंपाउंड रेड वाइन, कॉफी आणि फळांसह निसर्गाच्या इतर अनेक ठिकाणी आढळतात. ते प्रतिजैविक असतात आणि बहुतांश सूक्ष्म जिवांचे मेटाबॉलिझम रोखतात.
सागरी गवत ३५ पट वेगाने दुप्पट कार्बन शोषते
सागरी गवत ३५ पट वेगाने कार्बन शोषते. या गवताच्या कार्बन कॅप्चर नुकसानीच्या गणनेत समोर आले की, मानवी हालचाल व घटत्या पाणी गुणवत्तेमुळे सुक्रोझचे प्रमाण घटत आहे. त्यामुळे ब्ल्यू कार्बन इको सिस्टिम संरक्षित करणे गरजेचे आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.