आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कोरोना संकट:अमेरिका, इस्रायल, पाकसह 81 देशांत आता दुसरी लाट, कोरोना संकट दक्षिण आशिया, आफ्रिकेतील स्थिती बिघडेल

वॉशिंग्टनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जागतिक आरोग्य संघटनेने दिला इशारा
  • केवळ ३६ देशांत संसर्गाच्या प्रमाणात घट
Advertisement
Advertisement

जगातील ८१ देशांत कोरोनाची दुसरी लाट येण्याची चिन्हे आहेत. त्यात अमेरिका, इस्रायल, स्वीडन, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, बांगलादेशचा समावेश असल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.संघटनेचे प्रमुख डॉ. टेड्रॉस गेब्रेयसेस म्हणाले, दक्षिण आशिया, मध्य-पूर्व व आफ्रिकेतील देशांमध्ये परिस्थिती आणखी वाईट होण्याची चिन्हे आहेत. बहुतांश देशात अनलॉकमध्ये कोरोना संसर्गाची जोखीम वाढली आहे. लोक कोरोनापासून बचाव करण्याच्या नियमांचे पालन करताना दिसत नाहीत. या देशांत दोन आठवड्यात संसर्गाचे प्रमाण वाढले आहे. जगभरात गुरूवारी आढळलेल्या एकूण रुग्णसंख्येपैकी निम्मे रुग्ण अमेरिकेत होते. आफ्रिकेत १०० दिवसांत १ लाख रुग्ण आहेत. येथे १९ दिवसांतच रुग्णसंख्या दुपटीवर गेली. दक्षिण आफ्रिकेत दररोज सरासरी एक हजार रुग्ण आढळून येत आहेत. केवळ ३६ देशांत कोरोनाचे नव्या रुग्णसंख्येत घट दिसून येते. सर्व कोरोना पीडित देशांत चाचण्यांचे प्रमाण वाढवले पाहिजे. संशयित रुग्णांसाठी क्वारंटाईनची चांगली व्यवस्था असली पाहिजे.

जग : दूतावासात २० जण बाधित, झिम्बाब्वेमध्ये आरोग्यमंत्री अटकेत

{अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथे अमेरिकी दूतावासातील २० कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यात बहुतांश सुरक्षा कर्मचारी आहेत. अफगाणिस्तानात एकूण २८,४२४ रुग्ण आहे, तर ५६९ मृत्यू झाले आहेत. {झिम्बाब्वेमध्ये आरोग्यमंत्री ओबादिया मोयोंना मास्क घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. सरकारने येथे एका कंपनीला मास्कचे कंत्राट दिले होेते. कंपनी सरकारला एक मास्क २१२५ रुपयांना विकत होती. जे जास्त होते.

अमेरिका : वॉशिंग्टन, न्यूयॉर्क सिटीत उद्यापासून अनलॉक-२
अमेरिकेत वॉशिंग्टन आणि न्यूयॉर्क शहरात सोमवारी अनलॉक-२ सुरू होईल. न्यूयॉर्क शहरात सलून व इतर दुकाने उघडतील. मोठ्या दुकानांंमध्ये अपॉइंटमेंट घेऊन जाता येईल. बाहेर जेवायलाही जाता येईल.किमान तीन महिने सतर्क राहावे. वॉशिंग्टनमध्ये अनलॉक-२ मध्ये रेस्तराँ, अनावश्यक वस्तूंची दुकाने उघडतील. ५० जणांना एकत्रितपणे जमता येईल. धार्मिक स्थळांवर १०० जणांना जमता येईल. अमेरिकेत १,२१,४२४ मृत्यू झाले आहेत.

कोरोना योद्ध्यांना पोप यांच्याकडून शाबासकी
इटलीत कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांची शनिवारी पोप फ्रान्सिस यांनी भेट घेऊन त्यांच्या कार्याचे कौतुक केले. त्यांना शाबासकी दिली.

Advertisement
0