आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रिन्स चार्ल्स गादीवर बसण्यापूर्वी गार्डियनने ‘कॉस्ट ऑफ क्राऊन’ मालिकेतून एक गौप्यस्फोट केला आहे. इंग्रजांनी कोहिनूरव्यतिरिक्त अनेक मौल्यवान रत्नजडित दागिनेही भारतातून लुटले होते. या लुटीत मूर्ती, चित्रकृतींसह १९ पाचूजडित सोन्याच्या एका कमरबंदचाही समावेश होता. सुमारे पाच वर्षांपूर्वी बकिंगहॅम पॅलेसमध्ये उन्हाळ्यात आयोजित प्रदर्शनात या मौल्यवान वस्तूही ठेवण्यात आल्या होत्या. रॉयल कलेक्शनमध्ये विद्यमान प्रिन्स चार्ल्स यांच्या पसंतीचे रत्नही ठेवलेले होते. ब्रिटिश शासन काळातील शासकीय विभाग इंडिया ऑफिसच्या अभिलेखागारातील ४६ पानी फाइलच्या आधारे हा दावा करण्यात आला आहे. त्यात एका पडताळणीचा उल्लेख आहे. त्यात महाराणी मॅरी (एलिझाबेथ द्वितीय यांची आजी) यांच्या हवाल्याने त्यांच्या शाही दागिन्यांच्या स्रोताचा उल्लेख केला गेला आहे.
दस्तऐवजानुसार चार मोठे माणिक जडवलेला एक हारही खजिन्यात आहे. त्याला ३२५.५ कॅरेटचा सर्वात मोठा स्पायनल माणिक (लवचिक व कमी वजनी) देखील लावलेला आहे. त्याला ‘तैमूर रुबी’ असेही म्हटले जाते. १९१२ च्या अहवालानुसार विजयाचे प्रतीक म्हणून ही दागिने, रत्न कशा प्रकारे चार्ल्स यांच्या शाही संग्रहात ठेवण्यात आले याचे वर्णन त्यात आहे. नंतर महाराणी व्हिक्टोरियांना ते सोपवण्यात आले. आता ही रत्ने, दागिने शाही घराण्याची संपत्ती झाली आहे. १९६९ मध्ये बीबीसीच्या माहितीपटात महाराणी एलिझाबेथ त्याला सांभाळताना दिसून आल्या. ही रत्ने राणी व्हिक्टोरियांकडे पाठवण्याच्या आधी अनेक मोगल शासकांकडे राहिली. १९८७ मध्ये रॉयल ज्वेलरीच्या अभ्यासात लेस्ली फील्डने मोत्यांच्या दोन हारांचा उल्लेख केला होता. त्यात २२२ मोती व हिऱ्यांसह माणिकही होते. हेदेखील रणजित सिंह यांचे होते, असा दावा आहे. रणजितसिंह यांचे सर्वात धाकटे पुत्र दुलीप यांच्यावर दबाव टाकून पंजाबला ताब्यात घेण्याची गोष्ट तर जगजाहीर आहे.
शाही परिवाराची कमाई : चार्ल्सला २० वर्षांत ६ हजार कोटी मिळाले ब्रिटिश शाही परिवार जगातील प्रतिष्ठित परिवारांपैकी आहे. ७४ वर्षीय चार्ल्स यांना खासगी फंड डची ऑफ कॉर्नवालमधील सेवांसाठी ६,२२१ कोटी रुपये मिळाले. एकूण एंगेजमेंट १०,९३४ एवढे आहेत. राजा झाल्यानंतर त्यांना खर्चासाठी वार्षिक २०० कोटी रुपये मिळतील. राणी म्हणून कॅमिला यांना विल्टशायरमध्ये मोठे घर मिळाले आहे. उर्वरित व सदस्यांना मिळालेल्या पैशांचा खुलासा झालेला नाही.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.