आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (एआय) वाढत्या वापरादरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी मायक्रोसॉफ्ट आणि गुगलसह इतर एआय कंपन्यांच्या सीईओंची भेट घेतली. बायडेन यांनी एआय कंपन्यांना एआय उत्पादने लाँच करण्यापूर्वी सुरक्षा आणि पारदर्शकता सुनिश्चित करण्यास सांगितले.
अमेरिकी राष्ट्राध्यक्ष म्हणाले की एआयने व्यक्ती, समाज आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी विद्यमान आणि संभाव्य जोखीम कमी करणे आवश्यक आहे. कंपन्यांना एआय सुरक्षित असल्याची खात्री करावी लागेल. दोन तास चाललेल्या या बैठकीत उपाध्यक्ष कमला हॅरिस याही उपस्थित होत्या. हॅरिस म्हणाल्या की तंत्रज्ञानामध्ये जीवन सुधारण्याची क्षमता आहे, परंतु ते सुरक्षा, गोपनीयता आणि नागरी हक्कांची चिंता वाढवू शकते. वास्तविक, चॅटजीपीटीसारखे एआय अॅप लोकप्रिय होत आहेत. अन्य कंपन्या एआय लाँच करत आहेत. लाखो वापरकर्त्यांनी अशा एआय वापरास सुरुवात केली आहे, ते त्यांच्या आजाराविषयी माहिती देण्यासोबत स्क्रिप्ट्स, लॉ ब्रीफ आदी लिहू शकतात.
दोन तास चाललेल्या या बैठकीत गुगल-अल्फाबेटचे सुंदर पिचाई, मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनचे सत्या नाडेला, ओपनएआयचे सॅम ऑल्टमन आणि अँथ्रोपिकचे डारियो अमोदेई उपस्थित होते. त्यात उपाध्यक्ष कमला हॅरिस आणि बायडेन यांचे चीफ ऑफ स्टाफ जेफ जायंट्स, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन उपस्थित होते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.