आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अणू सुरक्षेची गोपनीय कागदपत्रे ट्रम्प यांच्या घरात:अमेरिकेच्या गुप्त मोहीमांचे दस्तावेजही जप्त; FBI च्या छापेमारीतून खुलासा

वॉशिंग्टनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या घरी एफबीआयने टाकलेल्या छापेमारीतून मोठा खुलासा झाला आहे. एफबीआय एजन्टसना या छापेमारीत दुसऱ्या देशांच्या लष्करी आणि आण्विक क्षमतेशी निगडीत कागदपत्रे मिळाली आहेत. माध्यमांतील वृत्तांनुसार, एफबीआय एजन्टसना या छापेमारीत अमेरिकेच्या टॉप सीक्रेट ऑपरेशन्सशी निगडीत कागदपत्रेही मिळाली आहेत. या कागदपत्रांविषयी सीनियर नॅशनल सिक्युरिटी ऑफिसर्सनाही माहिती नव्हती. केवळ राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि त्यांच्या काही निकटवर्तीयांनाच या स्पेशल अॅक्सेस प्रोग्रामविषयी माहिती होती. ते पूर्ण सेफ्टीसह बंद दरवाजांमध्ये ठेवले जात होते. या कागपत्रांसाठी अधिकाऱ्यांनाही अॅक्सेससाठी स्पेशल क्लिअरन्स दिला जात होता.

FBI ने 9 ऑगस्टला माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे आलीशान पॉम हाऊस आणि रिसॉर्ट मार-ए-लीगोवर छापा टाकला होता. इथल्या प्रत्येक गेटवर चांगली सुरक्षा ठेवण्यात आली होती.
FBI ने 9 ऑगस्टला माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे आलीशान पॉम हाऊस आणि रिसॉर्ट मार-ए-लीगोवर छापा टाकला होता. इथल्या प्रत्येक गेटवर चांगली सुरक्षा ठेवण्यात आली होती.

ट्रम्प यांनी बायडेन यांच्या पक्षावर केले आरोप
ही छापेमारी कोणत्याही नोटीसशिवाय केल्याचा आरोप ट्रम्प यांच्या निकटवर्तीयांनी केला आहे. जेव्हा एजन्टसनी छापा टाकला, तेव्हा ट्रम्प तिथे नव्हते. ट्रम्प छापेमारीत हस्तक्षेप करून याचा राजकीय मुद्दा बनवू शकले असते, त्यामुळेच असे करण्यात आल्याचे बोलले जात आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी छापेमारीला दुजोरा दिला आहे. डेमोक्रेटसची ही कृती त्यांना निवडणूक लढवण्यापासून परावृत्त करण्यासाठी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

ट्रम्प म्हणाले होते- हा कट्टर लेफ्ट डेमोक्रेट्सचा हल्ला आहे. मी 2024 ची निवडणूक लढवावी अशी त्यांची इच्छा नाही.
ट्रम्प म्हणाले होते- हा कट्टर लेफ्ट डेमोक्रेट्सचा हल्ला आहे. मी 2024 ची निवडणूक लढवावी अशी त्यांची इच्छा नाही.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या घरी छापेमारी का?
सीबीएस न्यूजने म्हटले आहे की, मार-ए-लीगोमध्ये एफबीआयची छापेमारी अमेरिकेच्या नॅशनल आर्काईव्ह रेकॉर्ड म्हणजेच अमेरिकेच्या सरकारी संस्थांच्या देखभालीच्या तपासाशी निगडीत आहे. या एजन्सीकडे स्वतःचे रेकॉर्ड सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी असते. आरोप आहे की, ट्रम्प यांनी गेल्या वर्षी व्हाईट हाऊस सोडताना अनेक कागदपत्रे आपल्यासोबत नेली होती. अनेक मोठ्या बॉक्समधून ही कागदपत्रे मार-ए-लीगोमध्ये नेण्यात आली होती. यानंतर अमेरिकन गुप्तचर संस्था ट्रम्प आणि त्यांच्या कुटुंबीयांवर नजर ठेवून होत्या.

यावर्षीच्या सुरूवातीला गोपनीय कागदपत्रांनी भरलेले 12 बॉक्स मार-ए-लीगो एस्टेटजवळ आढळले होते. याविषयीच्या तपासात आता वेग आला आहे.
यावर्षीच्या सुरूवातीला गोपनीय कागदपत्रांनी भरलेले 12 बॉक्स मार-ए-लीगो एस्टेटजवळ आढळले होते. याविषयीच्या तपासात आता वेग आला आहे.

टॉयलेटमध्ये फ्लश करायचे कागदपत्रे
काही महिन्यांपूर्वी ट्रम्प यांच्यावर आरोप लावण्यात आला होता की, राष्ट्रपतीपदावर असताना ते अधिकृत कागदपत्रे फाडून फ्लश करून टाकायचे. ट्रम्प यांनी इतकी कागदं फ्लश केली होती की, त्यामुळे व्हाईट हाऊसचे टॉयलेट जाम झाले होते. माजी राष्ट्रपतींच्या इतर प्रकरणांसोबतच कागद फाडण्याच्या सवयीचीही चौकशी व्हावी असे नॅशनल आर्काईव्हचे म्हणणे आहे.
न्यूयॉर्क टाईम्सच्या पत्रकार मॅगी हॅबरमॅन यांनी त्यांचे पुस्तक कॉन्फिडन्स मॅनमध्ये याविषयीची माहिती दिली होती. पुस्तकानुसार, व्हाईट हाऊसच्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले की, कागदांमुळे टॉयलेट चोकअप झाले आहे. त्यानंतर असे मानले गेले की, ट्रम्प यांनी कागदपत्रे फ्लश केली.

बातम्या आणखी आहेत...