आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजगातील नववे सर्वात श्रीमंत उद्याेगपती वॉरेन बफे यांच्याशी संबंधित स्टील कंपनीतील ४५० कर्मचारी गेल्या काही महिन्यांपासून वेतनवाढ व इतर मागण्यांवरून संपावर आहेत. अमेरिकेतील पश्चिम व्हर्जिनियात ही कंपनी आहे. या मुद्द्यावर सिनेटर बर्नी सँडर्स यांनी वाॅरेन बफे यांना पत्र पाठवले आहे. संपकऱ्यांच्या मागण्यांवर विचार केला जावा, असे सँडर्स यांनी पत्रातून बफे यांना म्हटले आहे. गेल्या काही वर्षांतील कर्मचाऱ्यांच्या वेतनाची आकडेवारीही सँडर्स यांनी या पत्रातून नमूद केली.
त्यावर वाॅरेन बफे यांनी उत्तर पाठवले : माझी मालकी असलेल्या काेणत्याही कंपन्यांच्या श्रम वादात मी पडत नाही. त्यासाठी बफे यांनी सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशनकडे सादर केलेल्या बर्कशायर हॅथवेच्या आर्थिक विवरणाच्या अहवालाचाही हवाला दिला. कंपनीचे व्यवस्थापन अधिकाऱ्यांमार्फत केले जाते. या अहवालातून गुंतवणूकदारांना याविषयी अवगत करण्यात आले आहे. कंपन्या कर्मचाऱ्यांच्या समस्या व्यक्तिगत पातळीवर साेडवतात. सँडर्स यांनी २८ डिसेंबरला हे पत्र पाठवले. “स्टील कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या अडचणी साेडवाव्यात, अशी माझी तुम्हाला व्यक्तिगत पातळीवर विनंती आहे. त्यातून कामगारांना सन्मानकारक वागणूक मिळत असल्याचे स्पष्ट हाेईल. त्यांना श्रमाचा याेग्य माेबदला मिळत आहे याची खात्री पटेल.’
पत्रावर कारवाईची शिफारस करणार नाही
बफे म्हणाले, तुमचे पत्र प्रेसिजन कास्टपार्ट्सच्या सीईआेंना पाठवले जात आहे. परंतु त्यावर काेणत्याही कारवाईची शिफारस केली जाणार नाही. कारण सीईआे स्वत:च्या कामाबद्दल स्वतंत्र व जबाबदार आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.