आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आफ्रिकन देशाच्या संसदेत खुर्च्यांची फेकाफेक, VIDEO:खासदाराने महिला मंत्र्याला थप्पड लगावताच सुरू झाली फ्रीस्टाइल हाणामारी

सेनेगल2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आफ्रिकन देश सेनेगलच्या संसदेत एका महिला मंत्र्याला थापड मारल्याने बराच वाद झाला. घटना 2 डिसेंबरची आहे. एका खासदाराने महिला मंत्र्याला थप्पड मारली. यानंतर संतापलेल्या महिला मंत्र्याने त्यांच्यावर खुर्ची फेकली. हा वाद इतका वाढला की दोन्ही नेत्यांनी एकमेकांशी हाणामारी सुरू केली आणि जोरदार लाथाबुक्क्या हाणल्या.

सर्वप्रथम पाहा घटनेचे 4 फोटोज...

छायाचित्रात खासदार महिला मंत्र्याला कानशिलात लगावताना दिसत आहेत.
छायाचित्रात खासदार महिला मंत्र्याला कानशिलात लगावताना दिसत आहेत.
थप्पड मारल्यानंतर महिला मंत्रीही संतापल्या. त्यांनी खुर्ची उचलून खासदारावर फेकली.
थप्पड मारल्यानंतर महिला मंत्रीही संतापल्या. त्यांनी खुर्ची उचलून खासदारावर फेकली.
या संपूर्ण घटनेदरम्यान आणखी एक विरोधी नेता महिलेला लाथ मारताना दिसला, त्यानंतर ते दोघेही जमिनीवर पडले.
या संपूर्ण घटनेदरम्यान आणखी एक विरोधी नेता महिलेला लाथ मारताना दिसला, त्यानंतर ते दोघेही जमिनीवर पडले.
संसदेत उपस्थित इतर खासदारांनी दोन्ही नेत्यांना रोखून मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. यानंतर संसदेचे कामकाज तहकूब करण्यात आले.
संसदेत उपस्थित इतर खासदारांनी दोन्ही नेत्यांना रोखून मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. यानंतर संसदेचे कामकाज तहकूब करण्यात आले.

आता जाणून घ्या संसदेत गोंधळाचे कारण...

संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होते. कामकाजादरम्यान, सत्ताधारी पक्षाच्या बेनो बोक याकर (बीबीवाय)च्या महिला मंत्री एमी एनडीये गनिबी यांनी अध्यक्ष मॅकी सॅल यांच्या तिसऱ्या कार्यकाळाला विरोध करणाऱ्या आध्यात्मिक नेत्यावर टीका केली. विरोधी पक्षाचे खासदार मस्साता सांब यांना ही गोष्ट आवडली नाही. ते आपल्या जागेवरून उठले आणि त्यांनी गनिबी यांना चापट मारली.

आध्यात्मिक नेत्याच्या टीकेबाबत खासदार मस्साता सांब म्हणाले - एका मंत्र्याने संसदेत एका आध्यात्मिक नेत्याचा अपमान केला आहे. हे चुकीचे आहे. महिला मंत्र्यांनी ही बाब गांभीर्याने घेतली नाही. टोमणे मारताना त्यांनी ते टाळले. सांब यांना हे आवडले नाही आणि त्यांनी महिलेला चापट मारली.

अमेरिकी संसदेच्या स्पीकरने फाडले होते ट्रम्प यांचे भाषण

देशाच्या संसदेत गदारोळ होण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2020 मधील कामकाजादरम्यान अमेरिकी संसदेच्या स्पीकर नॅन्सी पेलोसी यांनी तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे भाषण फाडून टाकले होते. द गार्डियनच्या वृत्तानुसार, पेलोसी यांनी ट्रम्प यांच्या भाषणाचे वर्णन 'अविश्वासाचा जाहीरनामा' असे केले. या सर्व वादांमुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी पेलोसी यांना ‘क्रेझी नॅन्सी’ असेही संबोधले होते.

घानाच्या संसदेत फ्रीस्टाइल हाणामारी

घानाच्या संसदेत एका विधेयकावरील चर्चेदरम्यान सरकार आणि विरोधकांमधील वाद इतका वाढला की, तेथे फ्रीस्टाइल हाणामारी झाली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. खासदारांमधील हाणामारी थांबत नाही तोच सुरक्षेसाठी तैनात असलेल्या मार्शल्सनी मध्येच येऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. काही खासदारांनी मध्यस्थी करण्याचाही प्रयत्न केला होता.

अमेरिकन संसदेत हिंसाचार, ट्रम्प बसून बघत होते

अमेरिकेतील 2020च्या अध्यक्षीय निवडणुकीत माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव झाला. यानंतर, 6 जानेवारी 2021 रोजी कॅपिटल हिल (यूएस संसद) वर त्यांच्या समर्थकांनी हल्ला केला. 2020च्या अध्यक्षीय निवडणुकीचे निकाल उलटवण्याचा हा प्रयत्न मानला जात होता. या संपूर्ण हिंसाचारात ट्रम्प मूक प्रेक्षक बनून राहिले.

बातम्या आणखी आहेत...