आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Seniors Are Doing 'Happy MBA' To Know The Happiness Of The Employees, Are You Happy In The Office ...

मंडे गुड रीड:कर्मचाऱ्यांचा आनंद जाणण्यासाठी वरिष्ठ करत आहेत ‘हॅप्पी एमबीए’, कार्यालयात आनंदी आहात का... असे विचारणारे बॉस वाढले

एमा गोल्डबर्गएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रीक तत्त्ववेत्ते अ‍ॅरिस्टॉटल यांनी म्हटले होते की, नोकरीत आनंद मिळत असेल तर कामात संपूर्णता येते. घराच्या स्वच्छतेसाठी रसायन तयार करणारी कंपनी डब्ल्यूडी - ४० चालवणारे गॅरी रीज यांनाही या सिद्धांतावर विश्वास आहे. गॅरी रीज आपल्या १७ कार्यालयांत काम करणाऱ्या ६०० कर्माचाऱ्यांच्या हे सातत्याने लक्षात आणू देतात की ते किती महत्त्वाचे काम करत आहेत. तथापि, त्यांना हेही मान्य आहे की कर्मचाऱ्यांच्या आनंदात कंपनीच्या अपारंपरिक धोरणांमुळे वाढ होते. गॅरी यांच्या कंपनीत कुणीही व्यवस्थापक नाही, फक्त मार्गदर्शक आहेत. सामुदायिक कामांत योगदान देणाऱ्यांना ‘मदर तेरेसा’ पुरस्कारही मिळू शकतो. बैठकांमध्ये एखादा कर्मचारी आपल्या सहकाऱ्यांना सकारात्मक आठवण राहण्यासाठी प्रेरित करू शकतो. कोरोनाच्या खूप आधीपासूनच अनेक कंपन्यांनी असे जाहीर केले होते की, कर्मचाऱ्यांना आनंदी ठेवण्याकडे त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. त्यांच्या या धोरणावर टीकाही झाली. असे असले तरी एखाद्या कॉलेज कॅम्पससारख्या कार्यालयात कर्मचाऱ्यांना मोफत जेवण देणाऱ्याही अनेक कंपन्या आहेत. आपल्या कर्मचाऱ्यांच्या आनंदाचा स्तर जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण करणाऱ्या कंपन्यांची संख्या आता सातत्याने वाढत आहे. यासोबतच कामाच्या ठिकाणचे वातावरण सुखद ठेवण्यासाठी सल्लागारांचीही मदत घेतली जात आहे.

तथापि, ‘वर्कप्लेस हॅप्पिनेस’चा शोध आणि त्यावर केल्या जाणाऱ्या खर्च हा अनेक जणांना कॉर्पोरेट जगताची एक चाल दिसत आहे. असे केल्याने कंपन्या भावनांना उत्पादनात रूपांतरित करू शकतील आणि आनंदी ठेवण्याच्या बदल्यात कर्मचाऱ्यांकडून ‘रिमोट वर्किंग’ किंवा वेतनवाढ यासारख्या मागण्या जोर धरू नयेत, ज्या कंपन्यांसाठी त्रासदायक आहेत. कोरोनाचे आकडे घटत असताना कर्मचारी आणि कंपन्यांमध्ये कार्यालयात परतण्याच्या मुद्द्यावरून संघर्ष वाढत आहे. हा संघर्ष वाढत असताना ‘वर्कप्लेस हॅप्पिनेस’ धोरणाचे टीकाकारही वाढत आहेत. कर्मचाऱ्यांनी कार्यालयात यावे म्हणून अनेक कंपन्या विविध प्रकारच्या गिफ्ट देत आहेत. जसे कर्मचाऱ्यांसाठी गुगल संगीताच्या कार्यक्रमांचे आयोजन करत आहे, तर मायक्रोसॉफ्ट बिअर टेस्टिंगचे आयोजन करत आहे. मात्र अनेक कर्मचाऱ्यांचे असे म्हणणे आहे की, अशा गिफ्टऐवजी त्यांना कामांच्या तासांत लवचिकता आणि महागाईच्या प्रमाणात वेतनवाढीत अधिक रस आहे.

एका ग्लोबल फाउंडेशनमध्ये कार्यक्रम अधिकारी असलेल्या जेसिका मार्टिनेज म्हणतात, की कार्यलयात आनंदी वातावरण ठेवण्याचा प्रयत्न म्हणजे कंपन्या कर्मचाऱ्यांच्या कामाचे वेळापत्रक सोपे करण्यासाठी तयार नाहीत... मात्र डिस्काउंट कूपन देऊ शकतात. मार्टिनेजचे फाऊंडेशन दीर्घकाळापासून कर्मचाऱ्यांसाठी दर आठवड्याला वाइन टेस्टिंगसारखे आयोजन करत आहे. आता कर्मचाऱ्यांना कामावर परत आणण्यासाठी भेटवस्तूंचेही वाटप करत आहे. मार्टिनेज म्हणतात की, आता सर्व कर्मचारी आपल्या ‘नॉर्मल’ नित्य कामावर परतले आहेत. परंतु वास्तव असे आहे की, महामारीच्या आधीही हे ‘नॉर्मल’ म्हणत असलेले प्रकार भयानकच होते. मग आम्हा लोकांना ते का दिले जात नाही, जे वास्तवात आम्हाला हवे आहे.

‘हॅप्पीनेस’ म्हणजे आनंदाची व्याख्या ही वेगवेगळ्या कामाच्या ठिकाणी वेगळी असू शकते. काही ठिकाणी हा आनंद स्वत:च आपल्या बॉसची निवड करण्यात तर काही ठिकाणी परफॉर्मंस रिव्ह्यूतून सुटका करून घेण्यात आहे. कार्यालयांमध्ये या आनंदाच्या मोजमापाचे स्तर आता किरकोळ झाले आहेत. परंतु आनंदाच्या या व्याख्येवर अनेकजण सहमत नाहीत. तुम्हाला हवे असेल तर दलाई लामा, डेल कार्नेगी आणि बारबारा एहरेनराइक पाहू शकता.

अनेक तज्ञांच्या मते कार्यालयात कर्मचाऱ्यांच्या आनंदासाठी कंपनीचे चिंता करणे चांगले आहे. परंतु सारा जॅफेसारखे तज्ञ याला कर्मचाऱ्यांना धोका आहे, असे मानतात. ‘वर्क वोन्ट लव्ह यू बॅक’च्या लेखिका सारा म्हणतात की, तुमचा बॉस तुम्हाला आनंद देण्यासाठी बसलेला नाही. ते जरी असे म्हणत असतील की त्यांचे लक्ष तुमच्या आनंदाकडे आहे, परंतु वास्तावात त्यांचे लक्ष कंपनीच्या फायद्यावरच असणार.

हॅपी लिमीटेड नावाच्या एक ब्रिटिश कन्सल्टन्सी फर्म वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी ‘हॅपी एमबीए’चा कोर्स करवून घेते. याचा खर्च तब्बल १४ लाख रुपये आहे. हा कोर्स पूर्ण केल्यावर कोणतीही पदवी नाही तर केवळ एक प्रमाणपत्र दिले जाते. डेनमार्ची वू-हू आणि त्याची सहायक कंपनी फर्म हार्टकाउंट आपल्या कंपनीतील कर्मचारी किती आनंदी आहेत, हे पाहण्यसाठी एक ऑनलाईन सर्वेक्षण करून घेते. या सर्वेक्षणासाठी क्लायंट कंपनीकडून दर महिन्याला प्रति कर्मचारी अंदाजे ३१० रुपये घेते. याशिवाय कन्सल्टन्सी फी देखील घेतली जो, परंतु कंपनीचेे संस्थापक अलेक्झांडर केरुल्फ याच्या खर्चाचा खुलासा करत नाहीत. हा खर्च प्रत्येक क्लायंट कंपनीसाठी वेगवेगळा असतो.

वू-हू आणि हार्टकाउंट आपल्या आठवड्याचे सर्वेक्षण समजण्यासाठी सांख्यिकी आणि मनोविकार तज्ञांची मदत घेतात. या सर्वेक्षणात ‘तुम्ही करता त्या कामावर तुम्हाला अभिमान आहे का?’ किंवा ‘तुम्ही नुकत्याच केलेल्या कामाचे कौतुक करण्यात आले का?’ अशा प्रश्नांचा समावेश असतो. याचा अभ्यास करून वू-हू आपल्या क्लायंट कंपन्यांना त्याचा अहवाल देते. तरीही अशा सर्वेक्षणातून हा विषय बाजूलाच राहतो की, अखेर आनंदी राहण्याचा अर्थ काय आहे? केरुल्फ म्हणतात की, कर्मचारी आपल्या कार्यालयात कितीवेळा सकारात्मक भावना जाणवते की, घरीही कार्यालयाबद्दल विचार करून त्याला सकारात्मक जाणवते... हेच कर्मचाऱ्यांचा आनंदीपणा दर्शवते.

पण असे आकलन करणारी आणखी एक कल्चर एम्प कंपनी आनंद मानण्यावर विश्वास ठेवते. ४५०० कंपन्यांबरोबर काम करणाऱ्या कल्चर एम्पमध्ये पीपल सायन्सच्या निदेशक मायरा कॅनन म्हणतात की, व्यक्तीनिहाय आनंदाची व्याख्या वेगवेगळी आहे आणि त्यावर नियंत्रण ठेवणे कुण्या कंपनीच्या हातात नसते. याशिवाय कर्मचाऱ्यांचा आनंद आणि त्याचा व्यग्रपणा मोजता येईल, अशा गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.

जेसिका मार्टिनेज म्हणतात की, कंपन्यांना कर्मचाऱ्यांना आनंदी ठेवण्याचे प्रयत्न त्यांची बिले भरण्याच्या कामी येत नाहीत. कार्यालयात मोफत जेवणमुळे कुटुंबासह वेळ व्यतीत करण्याची भरपाई करता येत नाही. प्रोग्रेसिव्ह थिंक टँक इकाॅनॉमिक पॉलिसी इन्स्टिट्यूटच्या अध्यक्ष हाइदी शियरहोल्ज यांचे असे मानणे आहीे की, वर्कप्लेस हॅप्पीनेससाठी कंपन्यांकडून करण्यात येणारे प्रयत्न वाईट सुरूवात नाही. परंतु तरीही उत्तम पगार, उत्तम सोयीसुविधा आणि उत्तम वर्क शेड्यूलपेक्षा दुसरे पर्याय होऊ शकत नाहीत.

आनंदावर फोकस करण्याचा व्यवसायावरही परिणाम
तज्ज्ञांनुसार ‘वर्कप्लेस हॅप्पिनेस’वर लक्ष केंद्रित केल्यास त्याचा थेट परिणाम व्यवसायावर दिसून येतो. जर्नल ऑफ लेबर इकॉनॉमिक्सनुसार कार्यलयात ज्या समूहांना चॉकलेट वाटण्यात आले आणि विनोदी कार्यक्रम दाखवण्यात आले अशा समूहांची उत्पादकता १२ % अधिक होती. जर्नल ऑफ फायनान्शियल इकॉनॉमिक्स नुसार १०० श्रेष्ठ कामाच्या ठिकाणांच्या यादीतील कंपन्यांनी भागधारकांना चांगले परतावे दिले आहेत.

बातम्या आणखी आहेत...