आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेन्शन बूमर्स:महागाईत निवृत्तिवेतनात घट आल्याने ज्येष्ठ चिंतित, नव्याने काम सुरू करण्याच्या तयारीत

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेत मालमत्तांच्या किमतीतील घसरण आणि महागाईमुळे ज्येष्ठ नागरिकांच्या निवृत्ती वेतनाचे मूल्य घटत आहे. यामुळे आहे ते निवृत्ती वेतनात उदरनिर्वाहासाठी कमी पडू शकते,अशी भीती ज्येष्ठांमध्ये आहे.

अमेरिकेत २०१९ च्या तुलनेत २०२१ मध्ये सेवानिवृत्त होणाऱ्या ज्येष्ठांच्या संख्येत ३३ लाखांची वाढ झाली आहे. प्यू रिसर्च सेंटरनुसार, ५५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या निम्म्यापेक्षा जास्त ज्येष्ठांनी निवृत्तीचा पर्याय निवडला आहे. मात्र, २०१९ मध्ये हे प्रमाण जवळपास ४८% होते. सर्वेक्षणानुसार, नुकतेच निवृत्त झालेले काही लाेक परत कामावर परतण्याचा विचार करत आहेत. जे पुन्हा कामावर येऊ शकत नाहीत किंवा तसे करण्याच्या विचारात नाहीत त्यांच्यासाठी पुढील आयुष्य समाधानकारक नसेल. महागाईचा भार केवळ ज्येष्ठ नागरिकांवरच पडला नाही. सरकारची सामाजिक सुरक्षा आणि राष्ट्रीय विमा योजनेवरही परिणाम झाला आहे. जागतिक युद्धानंतर वेगात वाढलेल्या जन्मदरात जन्मलेल्या मुलांना बेबी बूमर्स म्हटले जाते. ते सध्या पेन्शन बूमर्स होत आहेत. बहुतांश लोकांनी निश्चित लाभाच्या योजनांच्या सुवर्ण काळात काम केले आहे. यामध्ये फर्म किंवा एम्प्लॉयर कर्मचाऱ्यांना निवृत्त झाल्यावर पेन्शनचा लाभ देतात. अमेरिकेत पेन्शन निधीत सुमारे ४० लाख कोटी डॉलर रक्कम आहे,त्यापैकी १७ लाख कोटी डॉलर अशा पद्धतीच्या निवृत्ती वेतन योजनांत आहेत. अशा योजनांचे सदस्य आवश्य फायद्यात आहेत.

वाढत्या महागाईने अपेक्षेपेक्षा ६५% कमी उत्पन्न मिळेल महागाई वाढल्याने उत्पन्न १०% घटले व वार्षिक उत्पन्न प्रत्यक्षात ७५,००० डॉलरवर राहिले. महागाई पुढील ३० वर्षांपर्यंत सरासरी ३% राहिल्यास ९० वर्षांपर्यंत ज्येष्ठांनी जेवढी अपेक्षा केली असेल,त्यापेक्षा केवळ ६५% च उत्पन्न मिळेल.

बातम्या आणखी आहेत...