आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्बियाच्या शाळेत गोळीबार, 9 विद्यार्थ्यांचा मृत्यू:सर्व विद्यार्थी एकाच वर्गातील, 14 वर्षीय आरोपीस अटक

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सर्बियाची राजधानी बेलग्रेडजवळील एका शाळेत बुधवारी एका विद्यार्थ्याने गोळीबार केला. यात एकाच वर्गातील 9 विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

7 व्या इयत्तेत शिकणाऱ्या एका 14 वर्षीय विद्यार्थ्याने गोळीबार केला असून त्याला अटक करण्यात आली आहे. शाळा रिकामी केल्यानंतर पोलिसांनी शाळा सील केली आहे.

हल्ल्यातून बालंबाल बचावलेल्या विद्यार्थिनीला सावरताना तिची आई.
हल्ल्यातून बालंबाल बचावलेल्या विद्यार्थिनीला सावरताना तिची आई.

शिक्षकही गंभीर जखमी

मीडिया रिपोर्टनुसार- हल्ल्यात शाळेतील काही शिक्षकही गंभीर जखमी झाले आहेत. त्यांनी वाचण्याचा प्रयत्न केला, पण ते अपयशी ठरले. एक सुरक्षा रक्षकही जखमी झाला आहे. गृह मंत्रालयाने या घटनेची पुष्टी केली आहे. घटनेचा तपास केला जत असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे.

एका विद्यार्थिनीचे वडील म्हणाले - मी नशीबवान आहे की माझी मुलगी हल्ल्यातून वाचली. हल्ल्याच्या वेळी ती वर्गातच उपस्थित होती. आरोपी विद्यार्थ्याने गोळीबार सुरू करताच ती तिथून निसटण्यात यशस्वी झाली. तिने खिडकीतून हे हत्याकांड बघितले.

पोलिसांनी 8 विद्यार्थ्यांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. बहुतांश मीडिया रिपोर्टमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 9 सांगितली जात आहे.

हल्ल्यानंतर शाळेभोवती पालकांची गर्दी झाली.
हल्ल्यानंतर शाळेभोवती पालकांची गर्दी झाली.

आरोपीबद्दलची माहिती

आरोपी विद्यार्थ्यी हा सातव्या वर्गातील आहे. गोळीबारानंतर त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्याला शाळेबाहेर अटक केली.

अटकेनंतर पोलिस आणि शाळेच्या सुरक्षा यंत्रणेने जखमींना रुग्णालयात पोहोचवले.

या घटनेमागील कारण आम्हाला माहिती नसल्याचे शाळा व्यवस्थापनाने म्हटले आहे. आरोपीचा शाळेतील ट्रॅक रेकॉर्ड खूप चांगला आहे. तो काही दिवसांपूर्वीच शाळेत आला होता. हल्ल्यामागील कारणाचा शोध घेतला जात आहे.

घटनेनंतर हा परिसर सील करण्यात आला आहे.
घटनेनंतर हा परिसर सील करण्यात आला आहे.

सर्बियात बंदूक परवाना सहज मिळत नाही

सर्बियात अशा घटना सहसा घडत नाही. या घटनेनंतर स्थानिकांमध्ये तणावाचे वातावरण आहे. इथे बंदूक बाळगण्यास परवानगी नाही. 1990 नंतर काही लोकांकडेच इथे बंदुकीचा परवाना आहे.