आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Serum Institute CEO Adar Poonawalla । Claims Under Immense Pressure । Supply Of The Covishield Vaccine; News And Live Updates

सीरम इन्स्टिट्यूटच्या सीईओला धमकी:लंडनमध्ये अदार पूनावाला म्हणाले, भारतात लसीवरुन प्रचंड दबाव; अनेक मुख्यमंत्र्यांसह व्यावसायिकांनी फोन करुन दिली धमकी

लंडनएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • लोक फोन कॉलवर आम्ही त्यांना लस दिली नाही तर बरे होणार नाही असे सांगतात

देशात सध्या लसीकरणावरुन मोठा गोंधळ उडालेले आहे. दरम्यान, देशात कोविशिल्डचे उत्पादन करणार्‍या सीरम इंन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदार पूनावला यांना धमकीचे फोन येते आहेत. पुनावाला यांनी लंडन येथील टाईम्स यूकेला दिलेल्या एका मुलाखतीत हे आरोप केले आहे. ते पुढे म्हणाले की, देशात सध्या लसीचा मोठा तुडवडा भासत आहे. याच पार्श्वभूमीवर भारत देशातील काही ताकदवान नेते आणि व्यावसायिक फोन करुन धमकी देत असून त्यामध्ये अनेक मुख्यमंत्र्यांचादेखील समावेश आहे. सर्वांकडून त्वरित कोविशिल्ड लसीचा पुरवठा करण्याची मागणी होत आहे.

केंद्र सरकारने अदार पूनावाला यांना बुधवारी धमकीच्या पार्श्वभूमीवर व्हाय श्रेणी सुरक्षा दिली असल्याचे एका अधिकार्‍यांने सांगितले. त्यामुळे पूनावाला यांच्यासोबत आता केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) 4-5 कमांडो आणि 11 सुरक्षा कर्मचारी असणार आहे. परंतु, ही सुरक्षा त्यांना भारत देशात मर्यादीत राहणार आहे.

प्रत्येकाला वाटते की, प्रथम लस मिळावी
मुलाखतीदरम्यान, पूनावाला यांनी फोन कॉलचा संदर्भ देत सांगितले की, सर्व लोकांना वाटते की, लस सर्वप्रथम मला मिळावी. परंतु, लोकांनी अशाप्रकारे धमकी देणे समजण्यापलीकडे असल्याचे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले की, भारत देशात माझ्यावर लस पुरवण्याबाबत प्रचंड दबाव आहे. लोक अशी अपेक्षा करतील असे वाटले नव्हते.

धमकी - आम्हाला लस दिली नाही तर बरे होणार नाही

ते पुढे म्हणाले की, लोक फोन कॉलवर आम्ही त्यांना लस दिली नाही तर बरे होणार नाही असे सांगतात. परंतु, हा बोलण्याचा मार्ग नसून एकाप्रकारे धमकी असल्याचे ते म्हणाले. ते पुढे सांगतात की, मी त्यांचे म्हणणे ऐकले नाही तर काय होऊ शकते ते समजावून सांगायचा प्रयत्न करतात. या घटनांमुळे आम्ही आमची कामे योग्य प्रकारे करू शकत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

बातम्या आणखी आहेत...