आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामाच्या व्यापामुळे बसलेला धक्का टास्क पॅरालिसिस:कामाची यादी अन् वेळ निश्चित करा, काम संपल्यावर स्वत:ला बक्षीस द्या

वॉशिंग्टनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तुम्हाला अधिक कामाचा ताण आहे का? ही कामे करणे तुमच्या आवाक्याबाहेर आहे, असे वाटत आहे का? अशा स्थितीला टास्क पॅरालिसिस म्हणतात. बोस्टन विद्यापीठाच्या क्लिनिकल असिस्टंट प्रोफेसर एलन हेंद्रिकसेन सांगतात, कामाचा व्याप घाबरवून टाकतो. नापास झाल्यानंतरची, कमी लेखल्याची, मूर्ख किंवा लायक नसलण्याची ही भीती असू शकते. अशा स्थितीत योजना बनवणारा मेंदूचा स्वत:वरील नियंत्रण गमावतो.

कामाचे ठिकाण स्वच्छ केल्याने मेंदू कामाची तयारी करायला लागतो, स्वत:ला म्हणा : काम पूर्ण होईपर्यंत ब्रेक नाही कामाची अनेक तुकड्यांत करा विभागणी : कॅलगॅरी विद्यापीठाचे प्राध्यापक पीयर्स स्टील म्हणतात, आपल्या कामाचे इतके लहान तुकडे करा की, मेंदूला ते सोपे वाटू लागतील. ते निश्चित करा. यामुळे स्ट्रेस हार्मोन रिलीज होणे कमी होत जाते. तणाव कमी होतो तेव्हा मेंदू काम करण्यासाठी तयार होतो.

काम पूर्ण होईपर्यंत चहा-नाश्ताही घेऊ नका : काम संपत नाही तोपर्यंत स्वत:ला कामातून ब्रेक देऊ नका. चहा किंवा नाश्त्यासाठीही नाही. असे केल्याने कोणत्याही परिस्थितीत काम करायचेच आहे, यासाठी मेंदू तयार होईल. यामुळे तुमचे काम वेळेत पूर्ण होईल. आपल्या कामांची यादी बनवा : कोणतेही काम असो, आपल्या कामांची यादी बनवा. एकतर सर्वात महत्त्वाचे काम आधी करा किंवा सर्वात मजेशीर. देपॉल विद्यापीठाचे मानसशास्त्राचे प्राध्यापक जोसेफ फेरारी सांगतात, पहिले यश दुसऱ्या यशाचा मार्ग बनवते. कारण तुम्ही करू शकता यावर विश्वास बसतो.

लक्ष विचलित करणाऱ्या मोबाइलसारख्या वस्तूंपासून दूर राहा : आपल्या कामाचे ठिकाण स्वच्छ करा. डेस्क नीट करा. लक्ष विचलित करणाऱ्या मोबाइलसारख्या वस्तू दूरच ठेवा. डेस्क स्वच्छ केल्याने तुम्ही तुमच्या मेंदूला कामासाठी तयार करत असता. कामाचा वेग वाढवणे गरजेचे : आपले एखादे काम कधी करणार, त्यासाठी किती वेळ देणार, हे निश्चित करा. प्रा. एलन सांगतात, कामाच्या दर्जाचा विचार करू नका. काम पूर्ण होईल तेव्हा जास्त वाइट होणार नाही जितका तुम्ही विचार करत आहात. मात्र, कामाचा वेग वाढवणेही गरजेचे आहे.

बक्षीस मेंदूला अधिक अॅक्टिव्ह ठेवते : डॉ. फेरारी सांगतात, प्रत्येक काम पूर्ण झाल्यानंतर स्वत:ला बक्षीस द्या. हे अत्यंत जुने तंत्र आहे, पण नेहमीच कामी येते. एखादे काम पूर्ण झाल्यानंतर मिळणारे बक्षीस मेंदूला अधिक अॅक्टिव्ह ठेवण्यास मदत करते.

बातम्या आणखी आहेत...