आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अति महत्त्वाकांक्षा आयुष्याची शांतता नष्ट करते:छोटी-छोटी ध्येये निश्चित करा, यातून तुम्हाला मिळेल आनंद अन् दीर्घावधीत प्रगती

जॅमी दुचारमे | वॉशिंग्टन8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आठ तासांच्या नोकरीत १२-१२ तास जाऊ लागले, कुटुंब आणि नातेवाइकांसाठी वेळ नसेल, तुम्ही तुमचे छंदही जोपासू शकत नसाल तर समजा तुम्ही अति महत्त्वाकांक्षेला बळी पडला आहात. असे लोक व्यावसायिक यशासाठी मानसिक शांतता आणि शारीरिक आरोग्य दोन्ही गमावतात. अमेरिकेत मानसिक आरोग्यावर या वर्षी यूएस सर्जन जर्नलच्या ऑक्टोबरमध्ये आलेल्या अहवालात नमूद केले की, आता बहुतांश अमेरिकींना वाटते की, व्यावसायिक यशासाठी केल्या जाणाऱ्या धावपळीमुळे आयुष्य खराब होत आहे. कोरोना महामारीनंतर लोकांचा कामाप्रति विचार बदलला आहे. त्यामुळे कोणतेही मोठे ध्येय निश्चित करून त्यामागे धावणे व कुटुंबाचाही विसर होण्यापेक्षा आयुष्यात छोटी-छोटी ध्येये निश्चित करा आणि ते प्राप्त करण्याच्या सुखाची अनुभूती घ्या.

मानसशास्त्र रिचर्ड रेयान म्हणाले, एखादी गोष्ट प्राप्त करण्याची महत्त्वाकांक्षा ही वैयक्तिक आयुष्यातील अन्य पैलूंवर परिणाम होत नाही तोवर ठीक आहे.

आवड पाहा, मिळणारा रिवाॅर्ड नव्हे संशोधनानुसार, एखाद्या गोष्टीसाठी मिळणारे बक्षीस उदा. कॅश रिवॉर्ड‌्स त्याच्यासाठी आंतरिक प्रेरणा संपवते. उदाहरणार्थ सायकल चालवण्यासाठी जर एखादे अॅप रिवॉर्ड देत असेल आणि सायकल चालवणे हा तुमचा छंद असेल तर हळूहळू तुमचा त्यातील रस संपेल.

प्रगती आवश्यक पण शांतताही गरजेचीच टीम जज म्हणतात, आयुष्यात प्रगतीसाठी प्रयत्न करणेही आवश्यक आहे. नव्या गोष्टी शिका, पण विशेष नोकरी, वेतन वा जागेला प्रगती मानण्याचा विचार बदला. तुमचा विकासही होईल, शांततेने राहाल.

आपले कुटुंब आणि नात्यांना महत्त्व द्या रेयान म्हणतात, व्यावसायिक आयुष्यातील यश वाटून घेण्यासाठी नात्यांची गरज असते. त्यामुळे कुटुंबाला वेळ द्या. जे दूर आहेत, त्यांना फोन करा. तुम्हाला त्यांची काळजी आहे हे त्यांना सांगा. कौटुंबिक नाते बिघडवून मिळालेले यश मानसिक तणावच देईल.

प्रमोशन-वेतनासाठी काम करू नका कामातून काय मिळेल असा विचार करण्याऐवजी ते पूर्ण करण्याकडे लक्ष द्या. तरच जास्त समाधानी राहाल. प्रमोशन किंवा वेतन वाढवण्यासाठी केलेले काम पूर्ण झाल्यावरही तुम्हाला समाधान मिळणार नाही.

ध्यान करा आणि कृतज्ञ राहा : वेगवेगळ्या संशोधनातून उघड झाले की, जे लोक रोज ध्यान करतात, ते समाधानी असतात. ते शांततेने प्रगती करतात. कायम कृतज्ञ राहा.

बातम्या आणखी आहेत...