आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचांगल्या आरोग्यासाठी आठ तासांच्या झोपेचा फॉर्म्युला तितकासा अचूक ठरत नाही. खरे तर झोपेच्या अवधीचा संबंध वयाशीदेखील असतो हे लक्षात घेतले पाहिजे, असे केंब्रिज विद्यापीठ व शांघायच्या फ्रूडन विद्यापीठाच्या संशोधनातून समोर आले आहे. ४० ते ७५ वयोगटातील लोकांसाठी सात तासांची झोप पुरेशी ठरते. कमी झोप किंवा जास्त झोप या दोन्ही गोष्टींचा मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. दररोज सात तासांच्या झोपेचे सातत्य असावे. एकेरात्री ९ तासांची झोप घेतली आणि दुसऱ्या रात्री सहा तासांची झोप घेतल्यास लाभ मिळत नाही. योग्य झोप न घेतल्याने ब्रेन फॉगसारखा आजार जडू शकतो. त्यामुळेच रात्री गाढ झोप न घेतल्याने सकाळी थकल्यासारखे वाटू लागते. ‘मेमरी सेंटर’ म्हणजेच हिप्पोकॅम्पसवर कमी किंवा जास्त झोपेचा परिणाम दिसून येतो. जास्त झोपेचे परिणाम हेदेखील कमी झोपेच्या परिणामासारखे का असतात याचा शोध आता संशोधक घेत आहेत. हेल्थ सर्व्हिस एनएचएसनुसार ब्रिटनमध्ये प्रत्येकी तीन वयस्करांच्या मागे एकाला अनिद्रेचा त्रास जाणवतो. त्यात मध्यम वयाचे तसेच वृद्धांचाही समावेश आहे. सर्केडियन रिदम एक्स्पर्ट डॉ. ग्रेग पॉटर म्हणाले, कमी झोप घेणाऱ्या लोकांमध्ये लठ्ठपणा, हृदयरोग, मधुमेह होण्याची शक्यता जास्त असते. जास्त झोप घेणाऱ्यांनादेखील अशाच आजारांना तोंड द्यावे लागते.
कोरोनाकाळात अनिद्रेचा त्रास; रुग्णांत २० टक्के वाढ
कोरोना महामारीच्या काळात ब्रिटनमध्ये अनिद्रेचा विकार जडलेल्यांचे प्रमाण २० टक्क्यांहून ४० टक्क्यांवर पोहोचले. अनारोग्यातील दोन तृतीयांश लोकांना अनिद्रेचा त्रास जाणवू लागला आहे. चांगल्या झोपेसाठी औषधी घेणाऱ्यांची संख्या ७० लाखांवर आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.