आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना विषाणू:अमेरिकेत कोरोनाची सात नवीन स्वरूपे आढळली

न्यूयॉर्क19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेत कोरोना विषाणूची सात नवीन स्वरूपे आढळली. ही नवीन स्वरूपे इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या नव्या स्वरूपाशी मिळत्याजुळत्या रूपात तयार होत आहे. एका संशोधनाच्या आधारावर अमेरिकी संशोधकांनी ही माहिती दिली. ही नवीन स्वरूपे इंग्लंडसारखी सांसर्गिक असेल का याबाबत संशोधकांनी स्पष्ट केलेले नाही. मात्र, नवीन स्वरूपे जास्त सांसर्गिक असू शकतात अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. लुसियाना स्टेट विद्यापीठाचे विषाणू शास्त्रज्ञ आणि संशोधनाचे सहलेखक जेरेमी कामिल यांनी सांगितले की, या म्युटेशनमध्ये काहीतरी आहे हे स्पष्ट आहे. मात्र नवीन स्वरूपे पेशीत कशी प्रवेश करतात याबाबत शास्त्रज्ञांना शंका आहे.

काच व प्लास्टिकच्या तुलनेत कागद व कपड्यांवर कोरोना विषाणू कमी दिवस जिवंत राहतो
भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मुंबईच्या संशोधकांनी एका अध्ययनाच्या आधारे म्हटले आहे की, काच आणि प्लास्टिकच्या पृष्ठभागाच्या तुलनेत कागद आणि कपड्यांवर कोरोना विषाणू कमी दिवस जिवंत राहू शकतो. ‘फिजिक्स ऑफ फ्लूड्स’ नावाच्या मासिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. संशोधनात प्लास्टिक, काच आणि कागद व कपड्यांसारख्या पृष्ठभागावर थेंब सुकण्याचे विश्लेषण करण्यात आले. संशोधनानुसार विषाणू काचेवर चार दिवसांपर्यंत आणि प्लास्टिक व स्टेनलेस स्टीलवर सात दिवसांपर्यंत जिवंत राहू शकतो, तर कागदावर केवळ तीन तास आणि कपड्यांवर दोन दिवस जिवंता राहतो.

बातम्या आणखी आहेत...