आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुर्की:जलविद्युत प्रकल्पासाठी वस्तीचे सातव्यांदा स्थलांतर

अंकारा21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुर्कीच्या आर्टविन प्रांतातील युसुफेली परिसरातील लोकांना सातव्यांदा स्थलांतरित व्हावे लागले. कारण ठरला शेजारी होऊ घातलेला जलविद्युत प्रकल्प. त्याच्या बंधाऱ्यामुळे आजुबाजूच्या सात गावांसह शहरातील रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले जात आहे. तेथील नागरिकांच्या पुनर्वसनाचे काम १८ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. नव्या शहरात २६०० हून जास्त घरे असतील. ३१७ आस्थापनांसाठी जागा, सात गावांतील नागरिकांसाठी ५२० घरे आणि पाच दुकानांचे बांधकाम प्रस्तावित आहे. आतापर्यंत २ हजार १६१ कुटुंबांना घरे सोपवण्यात आली. ग्रामीण भागातील १९६ जणांना निवारा मिळाला आहे.

२७५ मीटर उंच प्रकल्प आेरुह नदीच्या किनाऱ्यावरील युसुफेलीचे नाव ५० वर्षांत दोन वेळा बदलण्यात आले. स्थलांतरानंतर प्रकल्प पूर्ण भरल्यावर तुर्कस्तानच्या अर्थव्यवस्थेत त्यामुळे सुमारे ६५० कोटी रुपयांची भर पडेल. प्रकल्पाची उंची २७५ मीटर आहे. म्हणजे १०० मजली इमारतीएवढी उंची आहे. पुढील वर्षी हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने काम करेल येथे ५४० मेगावॅट वीजनिर्मिती होऊ शकेल. जलविद्युत क्षेत्रात हा प्रकल्प २ टक्के वीजनिर्मितीचे योगदान देईल.

बातम्या आणखी आहेत...