आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंडोनेशियात विवाहापूर्वी सेक्सवर बंदी:नव्या कायद्याला मंजुरी; आता लग्नाच्या आधी संबंध ठेवणे गुन्हा

जकार्ता2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंडोनेशियाच्या संसदेने विवाहापूर्वी लैंगिक संबंधांवर बंदी घालणाऱ्या विधेयकाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे इंडोनेशियात विवाहापूर्वी लैंगिक संबंध ठेवणे बेकायदेशीर आणि गुन्हा मानले जाईल.

या कायद्यानुसार, केवळ पती-पत्नीच शारीरिक संबंध ठेवू शकतात. जर विवाहित जोडप्यातील एखाद्याने जोडीदाराशिवाय दुसऱ्यासोबत शारीरिक संबंध ठेवले तर ते गुन्ह्याच्या कक्षेत येईल.

कारवाई केव्हा होईल?

पहिल्या स्थितीत अविवाहितांवर तेव्हा कारवाई होईल, जेव्हा त्यांच्या आई-वडिलांनी त्यांच्याविरोधात तक्रार केली असल्यास. तर विवाहित जोडप्यांच्या बाबतीत एखादी महिला किंवा पुरुषाने जोडीदाराविरोधात तक्रार केल्यास कारवाई होईल.

कायद्यानुसार, कोर्टात खटला सुरु होण्यापूर्वी तक्रार मागेही घेतली जाऊ शकेल. मात्र एकदा खटला सुरु झाला तर कायद्यानुसार कारवाई केली जाईल. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना एक वर्ष कैदेसह आर्थिक दंडाची शिक्षा होऊ शकते.

यापूर्वी विरोधामुळे विधेयक लागू झाले नाही

इंडोनेशियन सरकारने सुमारे तीन वर्षांपूर्वीही हा कायदा आणण्याची तयारी केली होती. मात्र लोकांनी याला विरोध करत रस्त्यावर आंदोलने सुरु केली होती. त्यांनी हा कायदा भाषणस्वातंत्र्याचे उल्लंघन करणारा असल्याचे म्हटले होते. तेव्हा परिस्थितीचे गांभीर्य बघता सरकारने हा कायदा मागे घेतला होता.

बातम्या आणखी आहेत...