आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानात निवडणुकीचे वारे:नवाज यांच्या भेटीसाठी शाहबाज मंत्रिमंडळासह लंडनला दाखल

इस्लामाबाद5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी बुधवारी लंडन गाठले. तेथे त्यांनी थोरले बंधू नवाज शरीफ यांची भेट घेतली. त्यांच्यासमवेत सरकारमधील अनेक मंत्रीही होते. नवाज नवीन आघाडी सरकारबद्दल चर्चा करतील, असे सूत्रांनी सांगितले. ही बैठक व्हर्च्युअल करायची नाही, असा निर्णय नवाज यांनी घेतला होता. त्यामुळे या बैठकीत मोठा निर्णय होईल अशी शक्यता आहे. पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले, नवीन लष्करप्रमुखांच्या नियुक्तीपूर्वी नोव्हेंबरमध्ये निवडणूक घेतली जाऊ शकते. पाकिस्तान पीपल्स पार्टीने बुधवारी याबद्दल आपली भूमिका मांडली. पाकिस्तानात आधी निवडणूक सुधारणा व इतर कायद्यांत दुरुस्ती होणार आहे, असे पक्षाने स्पष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...