आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Shahbaz Government Withdraws From Mid term, Hopes To Complete Term, Finance Minister In Doha To Seek Help

पाकिस्तान:मध्यावधी घेण्यापासून शाहबाज सरकार मागे हटले, कार्यकाळ पूर्ण करण्याचा विश्वास व्यक्त, अर्थमंत्री मदत मागण्यासाठी दोह्यात

पाकिस्तानएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आर्थिक संकटामुळे राजकीय द्विधा स्थितीत अडकलेल्या पाकिस्तानच्या नव्या शाहबाज सरकारने मध्यावधी निवडणुकीला सामोरे न जाण्याचा निर्णय घेतला आहे. आघाडी सरकारच्या नेत्यांशी पंतप्रधानांनी भेटीगाठी घेतल्यानंतर हा सामुदायिक निर्णय घेण्यात आला. हा निर्णय घेतला असतानाच आर्थिक संकटांवरील उपाय करण्यासाठी अर्थमंत्री मिफ्ता इस्माइल यांनी कतारची राजधानी दोहा गाठले आहे. तेथे ते इंटरनॅशनल मॅनिटरी फंडातून (आयएमएफ) पाकिस्तानातील आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठीच्या उपायांवर बोलतील. असे म्हटले जात आहे की, आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी शाहबाज सरकार मोठे निर्णय घेऊ शकते. त्याचबरोबर माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडून निवडणुका घेण्यासाठी येत असलेला दबाव परतून लावण्यासाठी आघाडीतील पक्षांनी एकजूट दाखवत म्हटले की, पाकिस्तानला आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासोबतच देशाच्या विकासासाठीही अनेक निर्णय घ्यावे लागतील. त्यामुळे सरकारला मुदतपूर्व निवडणूक घेण्यापेक्षा जनतेला सोबत घेऊन बिकट परिस्थितीवर मात करणे हाच एकमेव मार्ग आहे. आयएमएफचे सहकार्य गरजेचे आहे. कारण देश दिवाळखोरीत निघण्याची शक्यता असल्याने आघाडीतील सर्व पक्षांनी पंतप्रधान शाहबाज यांच्या नेतृत्वात संकटांशी लढण्याची तयारी केली.

इम्रानच्या इस्लामाबाद मोर्चापूर्वी दाखवली ताकद
रविवारी माजी पंतप्रधान आणि पीटीआयचे अध्यक्ष इम्रान खान यांनी २५ मे रोजी इस्लामाबादपर्यंत मोर्चा काढण्याची घोषणा केली. या घोषणेमागे लवकर निवडणुका घेण्याची मागणी करणे, हा मोठा उद्देश असून सोबतच नवीन सरकारला लोकांसमोर प्रत्येक मोर्चावर अपयशी दाखवण्याची तयारीही केली गेली. शाहबाज सरकारने इम्रान खान यांच्या मनसुब्यांवर पाणी फेरण्यासाठीच एकजूट दाखवल्याचे म्हटले जातेय.

बातम्या आणखी आहेत...