आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी शुक्रवारी UNGA च्या 77 व्या अधिवेशनाला संबोधित केले. त्यात त्यांनी भारताने जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कल 370 रद्द करण्याच्या मुद्याला हात घालून भारतावर टीका केली. पाकला भारतासोबत शांतता व चांगले संबंध हवेत. पण ही शांतता जम्मू काश्मीर वादाच्या न्याय व स्थायी तोडग्यावर अवंलबून आहे, असे ते म्हणाले. त्यांच्या या विधानाचा भारताने खरपूस समाचार घेतला.
शाहबाज शरीफ यांनी आपल्या भाषणात 10 वेळा काश्मीर व 9 वेळा भारताचे नाव घेतले. त्यावर संयुक्त राष्ट्रातील भारतीय मोहिमेचे प्रथम सचिव मिजिटो व्हिनिटो म्हणाले - पाकने जम्मू काश्मीवर दावा सांगण्यापेक्षा सीमापार दहशतवाद थांबवावा. ते आपल्या काळ्या कारवाया लपवण्यासाठी भारतावर असे आरोप करत आहेत.
कलम 370 काय म्हणाले शाहबाज?
शाहबाज शरीफ यांनी आपल्या भाषणात कलम 370 चा एकदाही उल्लेख केला नाही. पण त्यांचा रोख त्याकडेच होता. ते म्हणाले - भारताने 5 ऑगस्ट 2019 रोजी जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करण्याचा एकतर्फी निर्णय घेतला. भारताच्या या निर्णयामुळे या प्रकरणी तोडगा काढणे अत्यंत अवघड झाले आहे. जम्मू काश्मीरला हिंदू टेरेटरी बनवण्याचा कट रचला जात आहे. येथे त्यांच्या बोलण्याचा रोख काश्मीरमधून कलम 370 रद्द करण्याकडे होता.
युद्ध पर्याय नाही - शाहबाज
ते म्हणाले - भारताने दोन्ही देशांच्या हितासाठी विश्वासार्ह पाऊल उचलले पाहिजे. 1947 पासून दोन्ही देशांत 3 युद्ध झाले. यामुळे दोन्ही बाजूला गरिबी व बेरोजगारी वाढली. आता हे आपल्यावर अवलंबून आहे की, आम्ही आपले मतभेद, समस्या व वादांवर शांततेत कसा तोडगा काढतो. मला वाटते की आता भारताला ही समजण्याची वेळ आली आहे. युद्ध कोणताही पर्याय नाही. केवळ शांततापूर्ण मार्गानेच वादावर तोडगा काढता येऊ शकतो. यामुळे जगाला शांतता लाभू शकते.
भारत म्हणाला - पाकने दहशतवाद थांबवावा
शरीफ यांच्या शेजाऱ्यांसोबत शांततेचे संबंध हवे असल्याच्या विधानावर व्हिनिटो म्हणाले - आपल्या शेजाऱ्यांशी शांततापूर्ण संबंध हवे असल्याचा दावा करणारा देश केव्हाही दहशतवादाला प्रोत्साहन देत नाही. तसेच मुंबईवर हल्ला करणाऱ्या अतिरेक्यांनाही थारा देत नाही. पाक पंतप्रधानांनी भारतावर खोटे आरोप लावण्यासाठी या व्यासपीठाची निवड केली, ही गोष्ट अत्यंत खेदजनक आहे.
शाहबाज देशातील पूरस्थितीवरही बोलले
शाहबाज शरीफ यांनी पाकिस्तानातील पूरस्थितीचाही उल्लेख केला. ते म्हणाले की, भीषण पूरस्थितीमुळे 1500 हून अधिक जणांचा बळी गेला. त्यात 400 हून अधिक मुलांचा समावेश आहे. लाखो लोकांवर आजार व उपासमारीचे संकट घोंगावत आहे. देशातील जवळपास 80 लाख जनतेला या संकटाचा फटका बसला आहे. त्यांनी यावेळी पूरस्थितीच्या संकटाचा निपटारा करण्यासाठी जागतिक समुदायाला मदतीचेही आवाहन केले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.