आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाक PM शाहबाज शरीफ यांचा चीन दौरा:CPEC वर द्विपक्षीय मतैक्य, कराचीला पेशावरशी जोडणारा रेल्वे प्रकल्प लवकरच सुरू

बीजिंग25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ दोन दिवसीय दौऱ्यासाठी चीनमध्ये दाखल झाले आहेत. यादरम्यान ते आज CPEC संयुक्त सहकार्य समितीच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करतील. यानुसार दोन्ही देशांनी कराची ते पेशावरदरम्यान रेल्वे मार्गाची 10 अब्ज डॉलरची योजना पुढे नेण्याचा निर्णय घेतला आहे.

PM शाहबाज शरीफ यांचा हा दौरा जिनपिंग तिसऱ्यांदा राष्ट्रपती झाल्यानंतर कोणत्याही राष्ट्र प्रमुखांचा पहिला दौरा आहे. यादरम्यान पाकिस्तान आणि चीन आपले संबंध मजबूत करण्यावर अधिक लक्ष देतील.

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ 1 नोव्हेंबरला चीनची राजधानी बीजिंगमध्ये दाखल झाले.
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ 1 नोव्हेंबरला चीनची राजधानी बीजिंगमध्ये दाखल झाले.

काय आहे CPEC

चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडोर ही चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांची महात्वाकांक्षी योजना आहे. याची सुरुवात 2013 मध्ये करण्यात आली होती. यात पाकिस्तानच्या ग्वादरपासून चीनच्या काशगर पर्यंत 50 अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीतून आर्थिक कॉरिडोर बनवला जात आहे. या माध्यमातून चीनची पोहोच अरबी समुद्रापर्यंत असणार आहे. CPEC अंतर्गत चीन रस्ते, बंदर , रेल्वे आणि ऊर्जा प्रकल्पांवर काम करत आहे.

CPEC संपुष्टात आणण्यासाठी इम्रान सरकार तयार होते

आशिया टाईम्सने दावा केला होता की पाकिस्तानातील इम्रान सरकारने 2022 च्या सुरुवातीला CPEC रद्द करण्याचा प्रस्ताव मांडला होता. तर ग्वादरमध्येही CPEC ला विरोध होत होता. त्यामुळे दोन वर्षांपासून हा प्रकल्प बंद आहे. यामुळे चीन नाराज होता. आता शाहबाज सरकार CPEC पुन्हा सुरु करून चीनची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करत आहे.

ML-1 प्रोजेक्ट चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोर (CPEC) चा एक महत्वाचा भाग आहे. याला CPEC चा बॅकबोनही म्हटले जाते.
ML-1 प्रोजेक्ट चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोर (CPEC) चा एक महत्वाचा भाग आहे. याला CPEC चा बॅकबोनही म्हटले जाते.

पाकिस्तानचे चीन प्रेम

अलिकडेच चीनी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सच्या एका ओपिनियन आर्टिकलमधअये शाहबाज शरीफ यांनि लिहिले, पाकिस्तान चीनसाठी मॅन्युफॅक्चरिंग बेस आणि त्याच्या इंडस्ट्रियल आणि सप्लाय चेन नेटवर्कच्या विस्ताराच्या स्वरुपात काम करु शकतो. दोन्ही देश कॉर्पोरेट फार्मिंग, हायब्रीड सीड आणि उच्च उत्पादन असलेल्या पिकांचा विकास आणि कोल्ड स्टोअरेज चेन स्थापन करण्यासाठी द्विपक्षीय सहकार्याला गती देऊ शकतात.

CPEC विषयी शाहबाज काय विचार करतात

ग्लोबल टाईम्सच्या आर्टिकलमध्ये शाहबाज यांनी लिहिले, CPEC च्या नव्या टप्प्यात उद्योग, ऊर्जा, कृषी, आयसीटी, रेल्वे आणि रोड नेटवर्कसारख्या प्रमुख क्षेत्रांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. सोबतच ग्वादर बंदराला व्यापार आणि ट्रान्सशिपमेन्ट, गुंतवणूक आणि क्षेत्रीय कनेक्टिव्हिटीचे केंद्र म्हणून विकसित केले जाईल.

बातम्या आणखी आहेत...