आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाकिस्तानमध्ये सोमवारी नव्या पंतप्रधानांची नविड होईल. पीएमएल-नवाजचे अध्यक्ष शाहबाज शरीफ (७०) पंतप्रधानपदासाठी विरोधकांचे संयुक्त उमेदवार आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे, सोमवारीच शाहबाज संबंधित १४०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात न्यायालय निकाल देणार आहे. दुपारी २.०० वाजता नॅशनल असेंब्लीची बैठक सुरू होऊन नवा पीएम नविडला जाईल. इम्रान यांच्याविरोधात रवविारी रात्री विरोधकांचा अविश्वास प्रस्ताव मंजूर झाला होता. उमेदवारी अर्ज भरताना शाहबाज म्हणाले की, राष्ट्रीय सद्भावनेस माझे प्राधान्य आहे. भारतासोबत शांतता हवी आहे, मात्र काश्मीरच्या मुद्द्यावरील उपायाशविाय शांतता शक्य नाही. त्यामुळे आम्ही काश्मीरच्या मुद्द्यावर भारताशी चर्चा करू. इम्रान सरकारमध्ये मंत्री राहिलेले फवाद चौधरी म्हणाले, शाहबाज यांच्या नविडीवर पक्षाचे सर्व खासदार राजीनामा देतील.
भारताशी व्यापारी संबंध सुधारण्याचे प्रयत्न
नवाज, शाहबाज मोठे व्यावसायिक आहेत. त्यांच्याशी संबंधित कंपन्या भारतासोबत व्यावसायिक संबंध सुधारण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे या दिशेने काम होऊ शकते.
भ्रष्टाचाराच्या अनेक खटल्यांचा सामना करत असलेले माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना आदरपूर्वक पाकिस्तानात आणण्याची तयारी सुरू झाली आहे. नवाज शाहबाज यांचे ते मोठे बंधू आहेत. अटक टाळण्यासाठी लंडनमध्ये राहणारे नवाज परत येण्याबाबत राजकीय तज्ज्ञ राणा मोहंमद तारीक म्हणाले, नवे सरकार पहिले काम हेच करेल. कारण शाहबाज आज जे काही आहेत ते नवाज यांच्यामुळेच आहेत. येत्या काही दविसांत नवाज यांच्याविरोधात सुरू असलेले सर्व खटले मागे घेण्यात येतील. याआधी असेच घडले असल्यामुळे पाकिस्तानसाठी हे नवे नाही.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.