आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहबाज शरीफांचा बदला:पाकव्याप्त काश्मीरच्या PMचा मॉल केला बंद, काही दिवसांपूर्वीच भाषणात आणला होता अडथळा

इस्लामाबाद4 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक

पाक पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सरकारी कार्यक्रमात अडथळे निर्माण करणे विरोधी पक्षनेते सरदार तनवीर इलियास खान यांना चांगलेच महागात पडले आहे. इस्लामाबादच्या स्थानिक प्रशासनाने त्यांचे दोन मॉल्स अवैध असल्याचे कारण देऊन बंद केलेत.

इलियास खान हे इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीक ए इंसाफ (PTI) पक्षाचे नेते व पाकव्याप्त काश्मीरचे (PoJK) पंतप्रधान आहेत. इलियास हे इम्रान यांचे मित्र आहेत. तसेच पाकच्या निवडक श्रीमंतांतही त्यांचा समावेश होतो. या घटनेचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

शाहबाज शरीफ यांनी तनवीर यांच्या टोकाटोकीवर कोणतेही भाष्य केले नाही.
शाहबाज शरीफ यांनी तनवीर यांच्या टोकाटोकीवर कोणतेही भाष्य केले नाही.

नेमके काय घडले होते

 • घटना 6 डिसेंबर रोजी रात्रीची आहे. त्याचा एक व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. शाहबाज एका सरकारी कार्यक्रमात भाषण देत होते. कार्यक्रमाला अनेक परदेशी पाहुणे व राजदूत उपस्थित होते. त्यामुळे शरीफ इंग्रजीत बोलत होते. काही मिनिटांनंतर शरीफ यांचे भाषण समारोपाकडे वळले.
 • शाहबाज यांचे भाषण संपताच तनवीर इलियास उभे राहिले व शरीफ यांना उद्देशून काहीतरी बोलले. शरीफ यांनी अनेकदा त्याना खाली बसण्याचा इशारा केला. पण तनवीर शांत झाले नाही.
 • यामुळे शाहबाज आपले भाषण आटोपून वेगाने आपल्या गाडीकडे निघून गेले. तनवीर यांनी त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा खूप प्रयत्न केला. पण त्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचता आले नाही.
सरदार तनवीर इलियास खान पाकच्या सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी एक आहेत.
सरदार तनवीर इलियास खान पाकच्या सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी एक आहेत.

तनवीर यांचे म्हणणे काय होते?

 • ‘पाकिस्तान टुडे’च्या वृत्तानुसार, पाकव्याप्त काश्मीरमधील पायाभूत सोईसुविधा अत्यंत खराब आहेत. येथील लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. या भागात वीज, पाणी, रस्ते व रुग्णालयासारख्या आवश्यक सुविधाही नाहीत.
 • या राज्यात इम्रान यांच्या पीटीआय पक्षाचे सरकार आहे. येथील मुख्यमंत्र्यांऐवजी पंतप्रधानपदाचे पद हेतुपुरस्सर रिक्त ठेवण्यात आले आहे. सद्यस्थितीत सरदार तनवीर इलियास खान येथील पंतप्रधान आहेत.
 • वृत्तानुसार, तनवीर यांची सर्वच देशी व परदेशी पाहुण्यांपुढे आपल्या समस्यांचा पाढा वाचण्याची इच्छा होती. पण शाहबाज यांची त्यांच्याशी स्वतंत्रपणे चर्चा करण्याची इच्छा होती. तनवीर यांची यासाठी तयारी नसल्यामुळे शरीफ नाराज झाले.
 • काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, तनवीर अत्यंत श्रीमंत आहेत. यामुळेच इम्रान यांनी त्यांना पीओकेचे पंतप्रधान बनवले. यामुळे तनवीरही मागे हटले नाही.
 • ते जियो न्यूजशी बोलताना म्हणाले - शाहबाज यांच्यासारख्या भ्रष्ट व असक्षम व्यक्तीची आपल्या देशाच्या पंतप्रधानपदी का निवड केली हेच कळत नाही.
इम्रान खान यांच्यासोबत तनवीर. खान यांनीच त्यांची पीओकेच्या पंतप्रधानपदी नियुक्ती केली होती.
इम्रान खान यांच्यासोबत तनवीर. खान यांनीच त्यांची पीओकेच्या पंतप्रधानपदी नियुक्ती केली होती.

सूडाची कारवाई

 • तनवीर यांचे राजधानी इस्लामाबादेत 2 आलिशान शॉपिंग मॉल्स आहेत. बुधवारी सकाळी स्थानिक प्रशासनाचे अधिकारी येथे पोलिसांसह आले. त्यांनी शॉपिंग मॉल्सच्या बाहेर नोटीस डकवली. त्यात नमूद करण्यात आले आहे की - इमारतीचे डिझाइन व सेफ्टी फीचर्स स्टँडर्ड्सच्या दृष्टिकोनातून अत्यंत खराब आहे. त्यामुळे इमारतीला सील ठोकले जात आहे. त्यानंतर तेथील कर्मचाऱ्यांना तत्काल बाहेर काढून इमारतीला टाळे ठोकण्यात आले.
 • तनवीर श्रीमंत व राजकीय प्रभावी व्यक्तीही आहेत. या कारवाईनंतर अनेक उद्योगपती सरकारविरोधात रस्त्यावर उतरले. त्यांनी इस्लामाबादेत रॅली काढून ही सूडाची कारवाई असल्याचा आरोप केला.
 • दुसरीकडे, सरकारने आपली बाजू स्पष्ट केली आहे. अधिकारी म्हणाले - प्रशासनाने यापूर्वीही 6 वेळा या मॉल्सला नोटीस बजावली होती. पण आतापर्यंत त्याच्या मालकांनी या प्रकरणी योग्य ती पाऊले उचलली नाही.
बातम्या आणखी आहेत...