आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तान:शाहबाज शरीफ यांची 41 दिवसांतच कोर्टात हजेरी; 16 अब्ज रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोपी

पाकिस्तानएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून श‌पथ घेऊन जेमतेम ४१ दिवस लोटले असतानाच शाहबाज शरीफ यांना आरोपी म्हणून विशेष न्यायालयात हजेरी लावावी लागली. सुमारे १६ अब्ज रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात शाहबाज व पुत्र हमजा शरीफ आरोपी आहेत. न्यायालयाने दोघांना जामीन मंजूर केला.

या प्रकरणाची सुनावणी आता २८ मे रोजी होणार आहे. आपल्यावरील सर्व आरोप राजकीय सुडातून करण्यात आल्याचे शाहबाज यांनी म्हटले आहे. एफआयए म्हणाले, पिता-पुत्र फरार राहिले आहेत. त्यांना जामीन दिला जाऊ नये. शाहबाज व हमजा यांना सरकारी नियुक्त्या करता येणार नाहीत. कारण सर्वोच्च न्यायालयाने त्यांना मनाई केली आहे हे विशेष. शरीफ सरकारला आर्थिक तसेच राजकीय समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अलीकडेच शाहबाज यांनी मंत्रिमंडळासह लंडन येथे बंधू नवाज शरीफ यांची भेट घेतली होती. म्हणून लवकरच निवडणूक होण्याची शक्यता सांगितली जाते.

वर्ल्ड बँकेची मदत
जागतिक बँकेच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर पंतप्रधान शाहबाज अर्थसंकल्प मांडण्यात येईल, असे जाहीर केले. पाक सरकार २०२२-२३ चा अर्थसंकल्प वित्त विधेयकासह १० जूनला मांडणार आहे. बजेटमध्ये सरकार ७० हजार कोटी रुपयांच्या अंदाजित खर्चाचा तपशील देईल. जागतिक बँक पाकिस्तान सरकारला १५५ कोटी रुपयांची आर्थिक मदत करेल. बुधवारी याबद्दलची पुष्टी केली जाणार आहे. आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या पाकिस्तानला सौदी अरेबियाकडून ५ अब्ज डॉलरची मदत मिळाली .

इम्रानकडून तीव्र विरोध
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनीही शाहबाज सरकारच्या विरोधात आंदोलन तीव्र केले आहे. इम्रान यांचा पक्ष पीटीआयने २५ ते २९ मेपर्यंत पाकिस्तानच्या विविध शहरांतून राजधानी इस्लामाबादपर्यंत लाँग मार्च जाहीर केला आहे. पंजाब प्रांतात शाहबाज शरीफ यांचे पुत्र हमजा यांना पाठिंबा देणाऱ्या पीटीआयच्या बंडखोर २५ आमदारांना अपात्र घाेषित केल्याने इम्रान यांना केंद्रातील शरीफ सरकारला घेरण्याची चांगलीच संधी मिळाली आहे. ते प्रत्येक सभेत शरीफ सरकारवर आरोपांच्या फैरी झाडत आहेत.

बातम्या आणखी आहेत...