आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Shamima Begum British Citizenship Issue, Woman Called Herself A Victim Of Trafficking, Issue Raised In India Too

'जिहादी ब्राइड'ला नागरिकत्व देण्यावर ब्रिटनमध्ये सुनावणी:महिलेने स्वतःला तस्करीची बळी म्हटले, भारतातही गाजला होता मुद्दा

लंडन16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

2019 मध्ये ISIS या दहशतवादी संघटनेचा निःसंशयपणे पराभव झाला. पण त्यासंबंधीची अनेक प्रकरणे अजूनही संपायला तयार नाहीत. ISIS मध्ये सामील झाल्यानंतर ब्रिटनचे नागरिकत्व गमावलेल्या शमिमा बेगम या महिलेने आपण निर्दोष असल्याचा दावा केला आहे. तिने सोमवारी ब्रिटनमध्ये एक याचिका दाखल केली, ज्यात स्वत:ला मानवी तस्करीचा बळी असल्याचे सांगितले.

शमिमा ब्रिटनचे नागरिकत्व परत मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. गतवर्षीच ब्रिटनच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार स्थापन करण्यात आलेल्या आयोगाने त्यांचा नागरिकत्वाचा अर्ज फेटाळला होता. त्यानंतर त्यांनी पुन्हा याचिका दाखल केली आहे. बेगमचे वकील तस्निमेन अकुंजी यांनी एएफपी वृत्तसंस्थेला सांगितले की, खटला आता ती मानवी तस्करीची बळी होती की नाही यावर लक्ष केंद्रित करेल. जे नागरिकत्व काढून घेण्यापूर्वी विचारात घेतले गेले नाही.

हा फोटो 23 फेब्रुवारी 2015 रोजी ब्रिटनच्या गॅटविक विमानतळावर बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाला होता. डावीकडून खदिजा सुलताना, शमिमा बेगम (मध्यभागी) आणि अमिरा आबासे दिसत आहेत. या तिघांचाही आयएसमध्ये जाण्यापूर्वीचा हा शेवटचा फोटो होता.
हा फोटो 23 फेब्रुवारी 2015 रोजी ब्रिटनच्या गॅटविक विमानतळावर बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाला होता. डावीकडून खदिजा सुलताना, शमिमा बेगम (मध्यभागी) आणि अमिरा आबासे दिसत आहेत. या तिघांचाही आयएसमध्ये जाण्यापूर्वीचा हा शेवटचा फोटो होता.

मानवी तस्करीची बळी की ISISची ब्राइड हाच गुंता

शमिमा बेगमच्या प्रकरणात दोन मुख्य पैलू आहेत. एकामध्ये ती इसिससाठी काम करणाऱ्या ब्राइडच्या भूमिकेत दिसत आहे. दुसरीकडे, ती मानवी तस्करीची बळी मानली जात आहे. शमिमाच्या वकिलांनी 2021 मध्ये प्रकाशित झालेल्या पुस्तकाच्या आधारे हा दावा केला आहे. कॅनडाच्या सुरक्षा सेवेच्या सांगण्यावरून बेगम आणि तिच्या मित्रांना सीरियात नेण्यात आल्याचे या पुस्तकात म्हटले आहे. त्यांना तिथे घेऊन जाणारी व्यक्ती कॅनडाला गुप्तचर माहिती लीक करत होती.

युरोपातील अनेक मुलींना ISISच्या ब्राइड बनवण्यात आले

इराक आणि सीरियाच्या अनेक भागांत वर्चस्व असताना ISISने आपल्या जिहाद लढ्यात अनेक देशांमध्ये राहणाऱ्या मुली आणि महिलांचा समावेश केला होता. या महिलांना पाश्चिमात्य देशांमध्ये जिहादी ब्राइड म्हटले जात असे. एका वृत्तानुसार या जिहादी संघटनेत सामील होण्यासाठी 900 लोक एकट्या ब्रिटनमधून गेले होते. ब्रिटनने यातील 150 लोकांचे नागरिकत्व रद्द केले होते. यामध्ये शमिमा बेगमसारख्या महिलांचा समावेश आहे. 2019 मध्ये या संघटनेच्या पराभवानंतर या लोकांना पुन्हा नागरिकत्व देण्यावरून वाद निर्माण झाला आहे. मानवाधिकार संघटनेने एएफपी या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, अशी 20 ते 25 ब्रिटिश कुटुंबे अजूनही सीरियाच्या छावण्यांमध्ये अडकलेली आहेत.

शमिमाने 2019 मध्ये मुलाला जन्म दिला. नंतर न्यूमोनियामुळे त्याचा मृत्यू झाला.
शमिमाने 2019 मध्ये मुलाला जन्म दिला. नंतर न्यूमोनियामुळे त्याचा मृत्यू झाला.

कोण आहे शमिमा बेगम?

ती बांगलादेश वंशाची ब्रिटिश नागरिक आहे. 2015 मध्ये ती इतर दोन मुलींसोबत IS मध्ये सामील होण्यासाठी सीरियाला गेली होती. अन्य दोन मुलींचा ठावठिकाणा लागला नाही. शमिमा 2019 मध्ये सीरियातील निर्वासित शिबिरात सापडली होती. ती 9 महिन्यांची गरोदर होती. मुलाचा जन्म झाला तेव्हा न्यूमोनियामुळे त्याचा मृत्यू झाला. रिपोर्ट्सनुसार शमीमाला आधी दोन मुलं होती, पण दोघांचा मृत्यू झाला.

शमिमा आत्मघातकी हल्लेखोरांसाठी जॅकेट बनवण्यात विशेषज्ञ असल्याचा आरोप आहे, मात्र हे तिने नाकारले.

भारतातही गाजला होता जिहादी ब्राइड्सचा मुद्दा

ISS मध्ये सामील झालेल्या अनेक भारतीयांच्या पत्नी अफगाणिस्तानात अडकल्या आहेत.
ISS मध्ये सामील झालेल्या अनेक भारतीयांच्या पत्नी अफगाणिस्तानात अडकल्या आहेत.

इतर देशांप्रमाणे भारतातूनही अनेक लोक जिहादी संघटनेत सामील होण्यासाठी इराक आणि सीरियात गेले. भारतीय सुरक्षा एजन्सीनुसार, 2018 पर्यंत केरळमधील 98 महिला, पुरुष आणि मुले दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेट (IS) मध्ये सामील झाले होते. यातील अनेक लोक युद्धादरम्यान एकाच वेळी मरण पावले होते. द हिंदूमधील वृत्तानुसार, गेल्या वर्षी भारताने अफगाणिस्तानमधून चार महिलांना परत आणण्यास नकार दिला होता. या महिलांचे पती जिहादी संघटनेसाठी लढताना मारले गेले.

बातम्या आणखी आहेत...