आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंतप्रधान शाहबाज लंडनला पोहोचले:लंडनमध्ये शरीफ कुटुंबीय निवडणार नवीन पाक लष्करप्रमुख, नवाज लवकरच परतणार

इस्लामाबाद / नासिर अब्बास4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानच्या राजकारणातील महत्त्वाचा पद लष्करप्रमुखांच्या नियुक्तीसाठी खलबते जाेरात आहेत. जनरल कमर जावेद बाजवा यांचा कार्यकाळ २९ नोव्हेंबरला संपेल. पाकिस्तान सरकारच्या उच्च बैठका सुरू आहेत. इजिप्तमधून पंतप्रधान शाहबाज शरीफ कतारहून विमानाने लंडनला पोहोचले. इजिप्तमधून पाकिस्तानात परतण्याचे ट्विट त्यांनी केले हाेतेे. पण नाट्यमय रितीने त्यांनी मार्ग बदलला. शरीफ खानदान लंडनमध्ये जमले आहे. नवाझ शरीफ आणि त्यांची मुलगी मरियम आधीच लंडनमध्ये आहेत. राजकीय तज्ज्ञ मतीन हैदर यांच्या मते, नवाझ यांना नवे लष्करप्रमुख नियुक्तीत स्वारस्य आहे. त्यात त्यांचे दोन हितसंबंध आहेत. पहिला - त्यांचे पाकिस्तानात लवकर परतणे आणि दुसरे - इम्रान यांच्या राजकीय हल्ल्यांपासून एक सुरक्षा कवच तयार करणे.

जनरल बाजवा यांना मुदतवाढ नाहीच, निरोप समारंभाचा फोटो जारी पाकिस्तानी लष्कराची मीडिया शाखा इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सने जनरल बाजवा यांच्या मुदतवाढीबाबतच्या शक्यतांना पूर्णविराम दिला. त्यांनी सियालकोट आणि मंगला गॅरिसनमध्ये पोहोचलेल्या जनरल बाजवा यांचा फोटो जारी केला आहे. ही बाजवा यांची फेअरवेल पार्टी असल्याचे आयएसपीआरने म्हटले.

05 लष्करप्रमुखांची नवाझ शरीफ यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात त्यांची नियुक्ती झाली आहे. 10 लष्करप्रमुख १९७२ पासून आतापर्यंत पाकिस्तानमध्ये नियुक्त करण्यात आलेले आहेत.

ले. जनरल मुनीर सर्वात ज्येष्ठ, पण इम्रानशी संबंध खराब बाजवा यांच्यानंतर ले. जनरल असम मुनीर हे लष्करप्रमुख होण्याच्या शर्यतीत ज्येष्ठ आहेत. तेे सध्याचे लष्करप्रमुख बाजवा यांच्या जवळचे आहेत. मुनीर आयएसआयचे प्रमुखही राहिले.पण तत्कालीन पंतप्रधान इम्रान खान यांच्या नापसंतीमुळे त्यांना आठ महिन्यांतच हटवण्यात आले. फैज हमीद आयएसआयचे प्रमुख झाले.

मिर्झा, अब्बास आणि हमीद यांचीही नावे आहेत चर्चेत नवे लष्करप्रमुख म्हणून जनरल शमशाद मिर्झा, ले. जनरल अझहर अब्बास आणि ले. जनरल फैज हमीद यांचीही नावे या शर्यतीत आहे. पाकिस्तानच्या संविधानात पंतप्रधानांच्या शिफारशीन्वये राष्ट्रपती नवीन लष्करप्रमुखाची नियुक्ती करतात. शहाबाज हे सहकारी पक्षांशी चर्चा करणार असल्याचे सांगण्यात येते.

इम्रानच्या पक्षाचा लाँग मार्च सुरू, दोन्ही मुलेही देशात इम्रान खान यांच्या पक्ष पीटीआयचा लाँग मार्च गुरुवारी सुरू झाला. जिथे हल्ला झाला त्याच ठिकाणाहून वजिराबादमध्ये मोर्चाला सुरुवात झाली. इम्रानची मुले कासिम आणि सुलेमान लंडनहून पाकिस्तानात पोहोचली. ते मोर्चात सहभागी नाहीत.

बातम्या आणखी आहेत...