आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इम्रान विरोधकाला पद देऊन मोठी खेळी:शरीफांनी पुलवामा हल्ल्याचे प्लॅनर मुनीर यांना बनवले लष्करप्रमुख

इस्लामाबाद/नवी दिल्ली7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लेफ्टनंट जनरल आसिम मुनीर पाकिस्तानचे नवे लष्करप्रमुख असतील. ते २९ नोव्हेंबरला निवृत्त होणाऱ्या जनरल कमर जावेद बाजवा यांची जागा घेतील. मुनीर यांना पुलवामात फेब्रुवारी २०१९ मधील हल्ल्याच्या कटाचा सूत्रधार मानले जाते. तेव्हा मुनीर पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयचे प्रमुख होते. मुनीर यांना माजी पंतप्रधान इम्रान यांचे विरोधक मानले जाते. दरम्यान, मुनीर यांचे नियुक्तिपत्र जारी होताच राष्ट्रपती आरिफ अल्वी सक्रिय झाले. गुरुवारी संध्याकाळीच ते रावळपिंडीहून चार्टर्ड विमानाने इम्रान खानसोबत तातडीच्या बैठकीसाठी लाहोरला धडकले. मुनीर आणि जॉइंट चीफ ऑफ स्टाफ ले. जनरल साहिर िमर्झा यांच्या नियुक्तीविरुद्ध अल्वी आणि इम्रान रणनीती आखत आहेत. अल्वी हे इम्रान यांचा पक्ष पीटीआयचे माजी नेते आहेत.

इम्रान यांनी मुनीर यांच्या नियुक्तीला विरोध दर्शवत आरोप केला की, लंडनमध्ये असलेले माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या आदेशावरून मुनीर यांना नियुक्त केले आहे. ते म्हणाले, लाँग मार्चमध्ये मुनीरच्या नियुक्तीवरून आम्ही रान उठवू. पंतप्रधान शाहबाज हे २५ नोव्हेंबरला लष्करप्रमुखांचे नाव घोषित करणार होते. मात्र २४ तारखेलाच घोषणा करून ते तुर्कीच्या दौऱ्यावर रवाना झाले.

मुनीरांचे कुणाशी काय कनेक्शन पीएम शाहबाज : मुनीर शाहबाजना लष्कराकडून सुरक्षा कवच पुरवतील. इम्राननी लाँग मार्चमधून लष्कर आणि सरकारवर हल्लाबोल केला आहे.

एक्स्पर्ट सुशांत सरीन, सीनियर फेलो, ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशन

शरीफ बंधूंनी ज्यांनाही मोठी पदे दिली, ते त्यांच्यावरच उलटले! {मुनीरांच्या नियुक्तीबाबत पीएम शरीफांचा विचार काय? शरीफ बंधूंचा नियुक्त्यांचा इतिहास खूपच वाईट आहे. मुशर्रफ यांनीही नवाज यांची सत्ता उलटवली होती. इक्बाल यांना एनएबी प्रमुख बनवले. त्यांनीच त्यांच्या भ्रष्टाचाराच्या फायली उघडल्या होत्या. {इम्रान-अल्वीची जोडी नियुक्ती राेखू शकेल का? हे जरा कठीणच आहे. सरकारकडे काहीतरी बॅकअप प्लॅन असेलच. घटनात्मक तरतुदीदेखील आहेत. तरीही मुनीर पदावर कायम राहिले तर इम्रान खान यांना थेट लष्कराविरुद्ध लढावे लागेल. {मुनीर यांचा कोणत्या मुद्द्यावर भर राहणार आहे? खरे तर मुनीर यांना सर्वात आधी लष्कराची एकजूट करावी लागेल. महिनाभराने चित्र स्पष्ट होईल. सध्या तर मुनीर यांची झाकली मूठ सव्वा लाखाची आहे.

७० वर्षे राजकारणात हस्तक्षेप केल्याने पाकिस्तानी लष्कराची प्रतिमा डागाळली माजी लष्करप्रमुख कमर बाजवा यांचे म्हणणे आहे की, ७० वर्षांपासून राजकारणात हस्तक्षेप केल्यामुळे लष्कराची प्रतिमा डागाळली आहे. बाजवा यांचा दावा आहे की, लष्कराने राजकारणात लुडबुड करणे बंद केले आहे. पुढेही करणार नाहीत.

बातम्या आणखी आहेत...