आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PAK पंतप्रधानांचा ऑडिओ लीक:शाहबाज शरीफ यांच्या घरातील संभाषण व्हायरल; भारतातून येणाऱ्या पॉवर प्लांटचाही आहे उल्लेख

इस्लामाबाद8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे घरही सुरक्षित नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कारण, त्यांच्या घरी होणाऱ्या बैठकांच्या ऑडिओ क्लिप ऑनलाईन लीक होत आहेत. सद्या सोशल मीडियावर पंतप्रधानांच्या बंगल्यात झालेल्या बैठकांतील निर्णयांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. तसेच पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचा आणि एका अधिकाऱ्यांच्या संभाषणाचा कथित ऑडिओही समोर आला आहे. या ऑडिओत माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांची मुलगी मरियम नवाज यांचा हवाला देत भारताचा उल्लेख करण्यात आला आहे.

पंतप्रधानांच्या घराच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
पाकिस्तानातील सर्वात मोठ्या वृत्तवाहिनी 'जिओ न्यूज' ने एका रिपोर्टमध्ये या प्रकरणाचा खुलासा केला आहे. रिपोर्टनुसार- वजीर-ए-आझम यांच्या घरी होणाऱ्या बैठकीचा ऑडिओ लीक झाला आहे. तर यावरून देशाची सुरक्षा किती मजबूत आहे, हे समजू शकते. समोर आलेल्या ऑडिओ लीकमध्ये इम्रान खान यांचा पक्ष पीटीआयला सामोरे जाण्याच्या रणनीतीवर विचार केला जात आहे. यामध्ये अनेक मंत्र्यांचे आवाज ओळखता येतील. ही ऑडिओ क्लिप आता ऑनलाईन उपलब्ध आहे. माध्यमांच्या अहवालानुसार, या ऑडिओ क्लिपमध्ये पंतप्रधान शाहबाज शरीफ, गृहमंत्री राणा सनाउल्ला, संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांच्यासह इतर काही नेत्यांचा आवाज आहे.

काही दिवसांपूर्वीच शाहबाज यांनी ब्लूमबर्गला मुलाखत दिली होती. यात त्यांनी जगाला पाकिस्तानच्या मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केलेले आहे.
काही दिवसांपूर्वीच शाहबाज यांनी ब्लूमबर्गला मुलाखत दिली होती. यात त्यांनी जगाला पाकिस्तानच्या मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केलेले आहे.

शाहबाज यांची ऑडिओ क्लिपही व्हायरल
शुक्रवारी सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. यात शाहबाज शरीफ यांचा आवाज असल्याचे सांगण्यात येत आहे. माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची मुलगी मरियम नवाज यांच्या जावयाबद्दल ते त्यांच्या एका अधिकाऱ्यांशी बोलत असल्याचे समोर आले.

संभाषणात अधिकारी शाहबाज यांना सांगत आहे की, नवाज शरीफ यांचा जावई भारतातून पॉवर प्लांट आयात करणार आहे. हा व्यवहार थांबला पाहीजे. PM हाऊसमध्ये गुप्त रेकॉर्डिंग सिस्टीम बसवण्यात आली असून तेथील अधिकाऱ्यांना याची माहिती देखील नाही, अशी चर्चा सुरू झाली आहे. याबाबत मंत्र्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला.

सौदी अरेबियाच्या क्राऊन प्रिन्ससोबत शाहबाज शरीफ. या ऑडिओ लीकचा पाकिस्तानच्या परराष्ट्र धोरणावरही गंभीर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असा आरोप पाकिस्तानच्या विरोधी नेत्यांनी केला आहे.
सौदी अरेबियाच्या क्राऊन प्रिन्ससोबत शाहबाज शरीफ. या ऑडिओ लीकचा पाकिस्तानच्या परराष्ट्र धोरणावरही गंभीर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असा आरोप पाकिस्तानच्या विरोधी नेत्यांनी केला आहे.

विरोधकांकडून सरकारवर हल्ला

  • इम्रान खान यांचा पक्ष पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफचे (PTI) नेते आणि माजी मंत्री फवाद चौधरी यांनी पंतप्रधान यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले की, आमच्या वजीर-ए-आझम यांच्या घरातील इंटरनेट डेटा चोरी जात आहे. हे देशाच्या गुप्तचर यंत्रणांचे अपयश आहे. आता सुरक्षा आणि परराष्ट्र मंत्रालयाशी संबंधित डेटाही शत्रूंच्या हाती लागला आहे. पीएम हाउसमधून आतापर्यंत 8 जीबी डेटा लीक झाला आहे.
  • पीटीआयच्या ज्येष्ठ नेत्या शिरीन मजारी म्हणाल्या की, नवाज शरीफ लंडनमध्ये बसून पाकिस्तानचे सरकार चालवत आहेत. हे ही तितकेच सत्य आहे. आता भारतातून वीज प्रकल्प आयात करण्याची चर्चा आहे. हे खुद्द शाहबाजच हे मान्य करित असल्याचे ऑडिओ क्लिपमधून समोर आले आहे.