आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइंग्लंडच्या कार्नवालमध्ये झालेल्या तीन दिवसांच्या जी-७ मुळे चीन संतापला आहे. या संमेलनाकडे आपल्याविरोधातील गट म्हणून चीन पाहत आहे. म्हणून त्याने रविवारी जी-७ देशांना धमकी देत सांगितले की, काही देशांच्या लहानशा गटाने जगाच्या भविष्याचा निर्णय घेण्याचा काळ खूप आधीच गेला आहे. लंडन येथील चिनी वकिलातीच्या प्रवक्त्याने सांगितले, देशांचा लहान गट जागतिक निर्णय घेण्याचा काळ आता नाही. आम्हाला नेहमीच वाटते की देश मोठा असो की लहान, मजबूत असो की कमकुवत, गरीब असो की श्रीमंत सर्व समान आहेत.
जगातील मुद्द्यांवर सर्व देशांसोबत सल्लामसलत केल्यानंतर निर्णय घ्यायला हवा. संमेलनातील दुसऱ्या जी- ७ देशांनी (अमेरिका, कॅनडा, ब्रिटन, जर्मनी, इटली, फ्रान्स आणि जपान) चीनचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प ‘बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह’ विरोधात नवा प्रकल्प आणून ड्रॅगनविरोधात बिगुल फुंकले आहे. यावरून चीन खूपच चिडला असून त्याने धमक्या देणे सुरू केले आहे. दुसरीकडे जी- ७ संमेलन जगभरात लसीकरण करणे, वातावरण बदल रोखण्यासाठी आपल्या वाट्याची मोठी रक्कम आणि तंत्रज्ञान देण्याच्या आश्वासनासह रविवारी संपन्न झाले.
मॅक्रॉनच्या वक्तव्यावर भडकले बोरिस जॉन्सन
बैठकीत फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी कथितरीत्या सांगितले की, उत्तर आयर्लंड ब्रिटनचा भाग नाही. यावरून ब्रिटिश पीएम बोरिस जॉन्सन संतापले व म्हणाले, हा आमचा अंतर्गत मुद्दा आहे. तर परराष्ट्रमंत्री डॉमिनिक राब यांनी सांगितले की, उत्तर आयर्लंडवर फ्रान्सच्या राष्ट्रपतींचे वक्तव्य अपमानजनक आहे. युरोपीय संघ उत्तर आयर्लंडला एक स्वतंत्र देश म्हणून पाहत आहे.
वातावरण बदलाचा सामना करण्यावरही भर
तीनदिवसीय बैठकीत वातावरण बदलाचा सामना करण्यावरही भर देण्यात आला. बोरिस जॉन्सन यांनी सांगितले, जागतिक कार्बन उत्सर्जनात ब्रिटनचा २०% वाटा आहे. आठवडा अखेरपासून वातावरण बदलाविरोधात लढाईला सुरुवात करणार. यात जी- ७ देश महत्त्वाची भूमिका पार पाडतील. ते म्हणाले की, वातावरण बदलाचा सामना करण्यासाठी जी-७ देशांनी संकल्प केला आहे.
जगातील चार कोटी मुलींना शिक्षित करण्याचे उद्दिष्ट
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी सांगितले, जी-७ देशांनी जगातील ४ कोटी मुलांना शाळेत आणणे व त्यांना शिक्षित करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी जी-७ चे नेते जागतिक भागीदारी करतील व निधी जमवतील. यासाठी ब्रिटन ४३० मिलियन पाउंड (सुमारे ४४४२ कोटी रुपये) दान देईल. ते म्हणाले, काही मुले शिक्षणापासून वंचित असणे आंतरराष्ट्रीय अपमान आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.