आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

म्यानमार:आधी मला गोळी घाला...आंदोलकांवर गोळ्या झाडणाऱ्या लष्कराला ननने ललकारले

म्यानमारएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • संचारबंदी माेडून नागरिक बाहेर, पाच मीडिया संस्थांचे परवाने रद्द

म्यानमारमध्ये तख्तपालटाच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. सैनिक सतत गोळीबार करत आहे. मंगळवारी विरोधाचे सर्वात शक्तिशाली छायाचित्र समोर आले. काचिनच्या मायित्किना येथे गोळ्यांचा वर्षाव होत असताना नन सिस्टर एन. रोज नू तावंग सैनिकांसमोर निर्भयपणे येऊन उभ्या राहिल्या. त्यांनी गुडघे टेकवून सैनिकांना आर्जव केले, ‘लहान मुले, महिला व निदर्शकांवर गोळ्या चालवणे बंद करा. त्यांना क्षमा करा. त्यांच्याऐवजी मला गोळ्या घाला....तुम्ही येथून निघून जात नाही तोवर मी हटणार नाही किंवा माझा मृत्यू होईपर्यंत अशीच ठाम राहणार आहे. हे बोल ऐकून सैनिकांनी सिस्टरसमोर हात जोडले. आता रक्तपात होणार नाही, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. आम्ही रस्ते मोकळे करत आहोत, असे सांगितल्यावर सिस्टर बाजूला झाल्या.

संचारबंदी माेडून नागरिक बाहेर, पाच मीडिया संस्थांचे परवाने रद्द
म्यानमारमध्ये सुरक्षा दलाद्वारे ताब्यात घेतलेल्या २०० विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ देशातील सर्वात मोठे शहर यांगूनमध्ये निदर्शने केली. रात्री आठ वाजता नागरिक संचारबंदी माेडून बाहेर पडले. त्याचे कव्हरेज केल्याने देशातील पाच मीडिया संस्थांचे परवाने लष्कराने रद्द केले आहेत.

बातम्या आणखी आहेत...