आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यूयॉर्क:गेल्या दशकात २०२० मध्ये भेदभावाच्या सर्वाधिक घटना, अमेरिका अटलांटात तीन स्पा सेंटरवर गोळीबार; ८ जणांचा मृत्यू

न्यूयॉर्कएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • श्वेत वर्चस्ववादाचा प्रचार वाढल्याने अमेरिकेतील हल्ले वाढल्याचा दावा

अमेरिकेच्या अटलांटा भागात बुधवारी गोळीबाराच्या तीन घटनांत कोरिया वंशाच्या सहा जणांसह ८ लोकांचा मृत्यू झाला. चीन तसेच कोरिया वंशाच्या लोक चालवत असलेल्या स्पा सेंटरवर ही घटना घडली. घटनेनंतर चीन तसेच कोरिया वंशाच्या समुदायात दहशतीचे वातावरण तयार झाले आहे. ट्रम्प यांनी कोरोनासाठी चीनला दोषी ठरवण्यात आल्यानंतर आशिया, चीन व कोरियन वंशाच्या लोकांवरील वाढत्या हल्ल्यांपैकी हा सर्वात मोठा हल्ला मानला जातो.

‘अँटी डिफेमेशन लीग’ या संस्थेने अमेरिकेत वेगाने वाढणाऱ्या श्वेत वर्चस्ववादाच्या प्रचाराबाबत बुधवारी एक अहवाल जारी केला. त्या अहवालानुसार अमेरिकेत २०२० मध्ये वर्णभेद, वंशभेद, ज्यूविरोध, इतर प्रकारच्या द्वेषाच्या सुमारे ५१२५ घटनांची नोंद झाली आहे. ही संख्या २०१९ च्या तुलनेत दुप्पट झाली. तेव्हा २७२४ घटना घडल्या होत्या. ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर हेट ग्रुपमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. त्यांना ट्रॅक करणे अतिशय कठीण आहे. २०२० मध्ये श्वेत वर्चस्ववादाचा प्रचार वाढला. अशा प्रकारचा उन्माद वाढण्याची ही या दशकातील पहिलीच वेळ आहे, असे या अहवालात नमूद केले आहे. आशियाई वंशाच्या लोकांनी गेल्या महिन्यात न्यूयॉर्कमध्ये समुदायावरील हल्ल्यांच्या निषेधार्थ तीव्र आंदोलन केले होते.

चिनींवर वांशिक हल्ल्यांच्या घटनांत १० टक्के वाढ
न्यूयॉर्कमध्ये मार्च ते डिसेंबर २०२० दरम्यान दक्षिण आशियातील लोकांवर तीन हजारांहून जास्त हल्ले झाले आहेत. न्यूयॉर्कमध्ये २०१९ च्या तुलनेत १० पटीने हल्ले वाढले. हे हल्ले बहुतेक वेळा चीन, तैवान व थायलंड वंशाच्या लोकांवर झाले. कोरोना वाढल्यानंतर आशिया वंशाच्या लोकांवरील हल्ल्यात वाढ होऊ शकते, असा इशारा एफबीआयने दिला होता. न्यूयॉर्क सिटीचे महापौर बिल डी. ब्लासियो म्हणाले, असे हल्ले स्थलांतरितांवरील अन्याय आहे.

पहिल्यांदाच एकट्याने बाहेर पडण्याची भीती वाटतेय..
न्यूयॉर्कच्या चायना टाऊनमध्ये स्पा शॉप चालवणाऱ्या ४७ वर्षीय लुइसा याँग म्हणाल्या, अशा प्रकारची दहशत आयुष्यात कधीही पाहिली नव्हती. पहिल्यांदाच मला न्यूयॉर्क शहरात एकट्याने बाहेर पडायला भीती वाटत आहे. माझ्यावर कोण आणि कधी हल्ला करेल याची मला कल्पना नाही. अमेरिकेत अशा प्रकारच्या ४० टक्के तक्रारी चिनी अमेरिकींनी नोंदवल्या आहेत. त्यानंतर १५ टक्के कोरियन व ८ टक्के फिलिपिनो अमेरिकन समुदायाच्या तक्रारी आहेत.

बातम्या आणखी आहेत...