आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

US मध्ये गोळीबार:इंडियानापोलिसमध्ये 8 लोकांचा मृत्यू, यामधील 4 शीख होते; ज्या वेअरहाउसमध्ये फायरिंग झाली तेथील 90% कर्मचारी इंडियन-अमेरिकन

9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अमेरिकेत 17 दिवसांत गोळीबाराची दुसरी घटना

अमेरिकेच्या इंडियानापोलिसमध्ये गुरुवारी रात्री झालेल्या गोळीबारात ठार झालेल्या 8 जणांमध्ये चार शीख होते. या घटनेत 5 लोक जखमीही झाले आहेत. जखमींमध्ये शीख हरप्रीतसिंग गिल (वय 45) यांचा समावेश आहे. त्याच्या डोळ्याजवळ गोळी लागली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा हल्ला झालेल्या फेडएक्स डिलिव्हरी सर्व्हिसच्या गोदामातील 90% कामगार भारतीय-अमेरिकन आहेत आणि बहुतेक शीख समुदायाचे आहेत.

इंडियानापोलिस मेट्रोपॉलिटन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमरजीत जोहल ( 66), जसविंदर कौर (64), अमरजीत सखों ( 48) आणि जसविंदर सिंह ( 68) अशी ठार झालेल्या चार शिखांची नावे आहेत. यापैकी पहिल्या तीन महिला होत्या.

फेडएक्सचा माजी कर्मचाऱ्याने केला हल्ला
हल्लेखोराचे नाव 19 वर्षीय ब्रॅंडन स्कॉट असे आहे. त्याने स्वत: ला गोळी झाडून आत्महत्या केली. फेडएक्सने हल्लेखोरांबद्दल फक्त सांगितले की तो कंपनीचा माजी कर्मचारी होता.

अमेरिकेत 17 दिवसांत गोळीबाराची दुसरी घटना
अमेरिकेत सातत्याने गोळीबाराच्या घटना घडत आहेत. 17 दिवसातील ही दुसरी घटना आहे. यापूर्वी 31 मार्च रोजी दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये झालेल्या गोळीबारात 4 जण ठार झाले होते. त्यात एका मुलाचा समावेश होता. यापूर्वी 22 मार्च रोजी बोल्डरमधील बॉम्बरने सुपर मार्केटमध्ये अंदाधुंद गोळीबार केला होता. या घटनेत 10 जण ठार झाले. स्थानिक पोलिस अधिकारीही यात सहभागी होता.

बातम्या आणखी आहेत...