आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Shooting In The First Wave Of Covid In The United States, A 35 Percent Increase In Homicides, The Highest In 27 Years

गोळी मारून हत्येत 35 टक्के वाढ:अमेरिकेत गोळी मारून 25 वर्षात जेवढ्या हत्या झाल्या त्यापेक्षा जास्त कोविड काळात!

न्यूयार्क4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेत सरकारी विभागाने जाहीर हिंसक घटनांच्या आकडेवारीची पुष्टी केली आहे. हा अहवाल जाहीर झाल्यानंतर अमेरिकेतील अनेेक प्रांतीय सरकारांची झाेप उडवणारा ठरला आहे. कोविडच्या पहिल्या लाटेत गोळी मारून हत्येच्या घटनांत ३५ टक्के वाढ झाल्याचे समाेर आले आहे. ही आकडेवारी एेतिहासिक मानली जात आहे.

अमेरिकेत बंदूक बाळगण्याचा राज्यघटनेने दिलेला अधिकार देशासाठी अडचणीचा ठरू लागला आहे. अमेरिकेत पुरुष असो की महिला, प्रत्येक जण बंदूक घेऊन फिरतो. त्यामुळेच दरराेज गोळी मारून हत्येच्या घटना घडतात. गेल्या काही वर्षांत वांशिक हिंसाचार वाढल्याने किरकोळ वादातूनही बंदुकीने गोळी मारल्याच्या घटनांत वाढ होत आहे.

गेल्या पंचवीस वर्षांत गोळी मारून हत्येच्या एवढ्या घटना २०२० मध्ये घडल्या आहेत. सीडीसीचे कार्यकारी प्रमुख तथा नॅशनल सेंटर फाॅर इन्ज्युरी प्रिव्हेन्शन अँड कन्ट्राेलचे संचालक डाॅ. डेबरा ई. होरी म्हणाले, कोराेनाच्या पहिल्या लाटेत अमेरिकेत गोळी मारल्याने सुमारे ४५ हजारांहून जास्त नागरिकांना प्राणास मुकावे लागले. १९९४ नंतर पहिल्यांदाच २०२० मध्ये गोळी मारून हत्येच्या सर्वाधिक घटना घडल्याचे दिसून आले आहे. त्यातही सर्वाधिक मृत्यू गरीब घरातील लोकांचे आहेत. तरुण कृष्णवर्णीयांकडून असमान अशा स्वरूपाचा कर वसूल केला जात आहे. कृष्णवर्णीय महिलांच्या मृत्यूंमध्येही वाढ झाली आहे. मृत्यूंमध्ये निम्म्यांहून जास्त आत्महत्या होत्या.

लॉकडाऊनमध्ये आठवड्याला १२ लाखांवर विक्री अमेरिकेत लॉकडाऊनच्या काळात एकाच आठवड्यात १२ लाखांहून जास्त बंदुकीच्या विक्रीचा विक्रम नाेंदवण्यात आला. श्वेतवर्णीय समुदायापैकी ७३ टक्के लोकांकडे २०२१ मध्ये बंदूक आहे. बंदूक बाळगणाऱ्यांमध्ये पुरुषांचे प्रमाण ६३ टक्के आहे. कृष्णवर्णीयांचे प्रमाण १० टक्के आहे. अमेरिकेत ३९ टक्के कुटुंबांकडे बंदूक आहे. २०१६ मध्ये हे प्रमाण ३२ टक्के होते.

बातम्या आणखी आहेत...