आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमेरिकेत गोळीबार:कॉलोराडोच्या सुपर मार्केटमध्ये बंदूकधारीने केला बेछूट गोळीबार, 10 लोकांचा मृत्यू, संशयित आरोपीला अटक

बोल्डर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेतील बोल्डर शहरात एका संशयित आरोपीने सोमवारी सुपर मार्केटमध्ये बेछूट गोळीबार केला. या गोळीबारात 10 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. मृतांमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याचाही समावेश आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार कॉलोराडोच्या किंग सुपर मार्केटमध्ये ही घटना घडली. पोलिसांनी या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेतले असून त्याला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले आहे.

बोल्डर पोलीस अधिकारी कॅरी यामागूची यांच्यानुसार, संशयित आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे. या गोळीबारात किती लोकांना मृत्यू झाला याविषयीची आणखी खुलासा करण्यात आलेला नाही. पोलिसांनी एका जखमी व्यक्तिला बेड्या घालून स्टोअरच्या बाहेर आणले आहे परंतु त्या व्यक्तीनेच गोळीबार केला असल्याची पुष्टी केलेली नाही.

बातम्या आणखी आहेत...