आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमेरिकेत बेबी फॉर्म्युला म्हणजे मुलांसाठीचे दूध आणि इतर बेबी फूडची प्रचंड टंचाई भासत आहे. मॉल्स आणि इतर स्टोअर्समधील बेबी फूड आणि बेबी फॉर्म्युल्याचे रॅक रिकामे आहेत. परिस्थिती अशी निर्माण झाली की, बेबी फूडचे उत्पादन वाढवण्यासाठी राष्ट्रपती जो बायडेन यांनी एका आठवड्यापूर्वीच संरक्षण उत्पादन अधिनियम लागू केला आहे. त्यांनी बुधवारी बेबी फूड उत्पादक आणि इतर भागीदारांसोबत आपत्कालीन बैठकही घेतली. बेबी फाॅर्म्युल्याचा पुरवठा युरोपियन देशांतून विमानाने आणण्याची घोषणाही केली. जर्मनी आणि इतर देशांतून बेबी फाॅर्म्युल्याच्या खेपा येत आहेत. तरीही टंचाई कायम आहे. यामुळे नवजात शिशूंसह त्यांचे पालकही त्रासले आहेत. हे लोक नाइलाजाने सोशल मीडिया बघून घरीच फार्म्युला बघून खरीच तयार करत आहेत.
काही महिलांनी गरजू मुलांना आपले ब्रेस्टमिल्क विकण्याचा प्रस्तावही दिला आहे. अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांत एका वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलाला फॉर्म्युला मिल्क पाजले जात आहे. एखाद्या समस्येमुळे आईमध्ये दूध तयार होत नसेल किंवा आईला स्तनपान देता येत नसेल तर बाळाला फॉर्म्युला मिल्क पाजले जाते.
संकटाचे संकेत गेल्या वर्षापासूनच मिळत होते
अमेरिकेतील ११,००० स्टोअर्सवर लक्ष ठेवून असणारी संशोधन संस्था डाटा सेम्बलीनुसार, देशात फॉर्म्युला मिल्कचा तुटवडा गेल्या वर्षीपासून भासत होता. पुरवठा साखळी विस्कळीत होणे आणि अन्य अनेक कारणांमुळे असे झाले. गेल्या महिन्यात लोकांनी साठा करण्यास सुरुवात केल्यानंतर ही स्थिती आणखी बिकट झाली. २४ एप्रिल रोजी सरासरी आउट ऑफ स्टॉक रेट उसळून ४०% झाला. हा नोव्हेंबरमध्ये ११% होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.