आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Shortage Of ICU Beds In Brazil, Treatment On Chairs; The Highest Number Of New Patients, Also An Increase In Mortality World Corona News And Updates

कोरोना महामारी:ब्राझीलमध्ये आयसीयू बेडचा तुटवडा, खुर्च्यांवर उपचार; सर्वाधिक जास्त नवे रुग्ण, मृत्युसंख्येतही वाढ

सँटियागो6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लसीकरणात जास्त असूनही चिलीमध्ये लॉकडाऊन

अमेरिकेनंतर जगातील सर्वात बाधित देश ब्राझीलमध्ये परिस्थिती बिघडत चालली आहे. येथे एकूण १.२४ कोटी नवे रुग्ण व ३.१० लाखांहून जास्त मृत्यू झाले. देशात आता जगातील सर्वाधिक नवे रुग्ण आढळून येत आहेत. मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे देशातील अनेक रुग्णालयांसमोर उपचाराचे संकट उभे राहिले आहे. राजधानी ब्राझिलियासह २६ पैकी १६ राज्यांत आयसीयू बेडचा तुटवडा जाणवू लागला आहे. ९० टक्के बेड फुल्ल झाले आहेत. रिओ ग्रँड डो सूल राज्यात आयसीयू केअर युनिटमधील प्रतीक्षा यादी दोन आठवड्यांत दुप्पट झाली आहे. येथे २४० गंभीर रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रेस्टिंगा रुग्णालयात अनेक रुग्ण खाटांचा तुटवडा असल्याने खुर्चीवर बसल्याबसल्या उपचार घेत आहेत. गेल्या आठवड्यात लष्कराने रुग्णालयाच्या बाहेर टेंट हॉस्पिटल सज्ज केले. परंतु ही व्यवस्थाही रुग्णांनी भरगच्च झालीये. रुग्णालयाचे संचालक पाउलो फर्नांडो म्हणाले, लोक गंभीर लक्षणे व कमी ऑक्सिजन असताना दाखल होत आहेत. त्यामुळे त्यांना तत्काळ उपचाराची गरज लागते.

लसीकरणात जास्त असूनही चिलीमध्ये लॉकडाऊन
देशातील सुमारे निम्म्या लोकसंख्येचे लसीकरण झाले. अमेरिकेतील चिलीमध्ये एक टप्पा संपला. परंतु स्थिती हाताबाहेर जात असल्याने देशात रविवारपासून लॉकडाऊन करावे लागले. देशात नवीन रुग्णसंख्येत वाढ झाली. शुक्रवारी चिलीत ७,६२६ रुग्ण आढळून आले. कोरोना काळातील ही सर्वाधिक संख्या आहे. इस्रायल, यूएईनंतर चिली हा लसीकरणातील तिसरा देश आहे.

दर तासाला १२५ लोकांचा मृत्यू
पाकिस्तानात रावळपिंडी, गुजरांवाला, सियालकोटच्या ११ भागांत लॉकडाऊन लावला. रविवारपासून लाहोर, फैसलाबाद, पर्यंत वाढवला जाणार आहे.
-युरोपीय संघाचे प्रमुख म्हणाले, ब्रिटनमध्ये यंदा मोठ्या प्रमाणात उन्हाळी सुट्यांची नोंदणी केली. म्हणूनच म्हणून नवा लॉकडाऊन फेटाळला.
स्थिती हाताबाहेर
-ब्राझीलमध्ये आयसीयू खाटांचा तुटवडा, खुर्चीवर बसून पीडितांवर उपचार

बातम्या आणखी आहेत...