आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Side Effect Of Global Warming | Winter Games Canceled Due To Scant Snowfall In Uttarakhand; This Is The Third Time In A Decade

ग्लोबल वॉर्मिंगचा दुष्परिणाम:उत्तराखंडमध्ये कमी बर्फवृष्टीमुळे विंटर गेम्स रद्द; एका दशकात ही तिसरी वेळ

मनमीत | डेहराडून2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तराखंडमध्ये ग्लोबल वॉर्मिंगचा दुष्परिणाम आता दिसत आहेत. आधी जेथे हिम रेषेच्या(स्नो लाइन) ५० मीटर मागे सरकल्याने हवामान बदलाची नोंद शास्त्रज्ञांनी घेतली होती. आता हिमवर्षाचा पॅटर्नही बदलत आहे. याच्या परिणामामुळे गेल्या एका दशकात उत्तराखंडमध्ये बर्फवृष्टी घटली आहे. यामुळे चमोली जिल्ह्यातील औलीत २३ ते २६ फेब्रुवारीपर्यंत आयोजित हिवाळी स्पर्धा रद्द केल्या आहेत. स्पर्धा रद्द होण्याची ही एका दशकातील तिसरी वेळ आहे. तीन दशकांपूर्वी स्पर्धेसाठी औली रोपवेने जोडले होते.

बातम्या आणखी आहेत...