आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिएना:जगातील सर्वात जुनी बँक बंद पडण्याची चिन्हे, इटलीच्या सिएनामध्ये 1472 मध्ये बँकेची स्थापना

सिएना / गॅया पियानगियानी, जॅक इव्हिंग2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगातील सर्वात जुनी बँक ‘बंका माँटे देई पासची डी सिएना’ बंद होण्याच्या उंबरठ्यावर आहे. ही बँक इटलीच्या सिएना शहरात आहे. या बँकेची स्थापना १४७२ मध्ये करण्यात आली होती. ही बँक माँटे देई पासची म्हणून परिचित आहे. गेल्या महिन्यात या बँकेची गणना युरोपातील सर्वात कमकुवत कर्जदाता बँकेच्या रूपाने करण्यात आली होती. युरोपीय नियामकांनी माँटे देई पासची बँकेच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेतला होता. त्यामधून बँकेतील आर्थिक घोटाळ्याची माहिती उजेडात आली होती. त्यामुळेच या बँकेची गंभीर मंदीतून वाटचाल सुरू आहे. माँटे देई पासची बँकेचा कारभार गेल्या काही वर्षांपासून संशयाच्या भोवऱ्यात अडकला होता. २००८ मध्ये मात्र बँकेसमोरील अडचणींत वाढ झाली. तेव्हा प्रतिस्पर्धी बँकेच्या अधिग्रहणासाठी मोठी रक्कम दिली होती. या बँकेचे अधिग्रहण करून माँटे देई पासची इटलीतील सर्वात मोठी तिसरी बँक बनण्याची महत्त्वाकांक्षी योजना होती. इटली सरकारने देखील आता बँकेचे वास्तव स्वीकारले आहे. सरकार बँकेच्या विक्रीची तयारी करत आहे. ही बँक खरेदी करण्यासाठी युनिक्रेडिट बँकेने पुढाकार घेतला आहे. माँटे देई पास खरेदीस तयार असून सरकारने बॅड डेबिट्स आपल्याजवळ ठेवावे, अशी अट मात्र युनिक्रेडिटने घातली आहे.

माँटे देई पासची बँकेची विक्री झाल्यानंतरही बँकेच्या नावात काही बदल होणार नाही. बँकेचे मुख्यालय सिएनामधून मिलानमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे. आता बँकेचे मुख्यालय सिएनाच्या एका किल्ल्यासारख्या इमारतीत आहे. इटलीच्या कोषागारातील माजी मुख्य अर्थशास्त्रज्ञ लॉरेंजो कोडोग्नो म्हणाले, सरकारी अनुदानातून बँकेला राष्ट्रीयीकृत करण्यात आले होते. आता बँकेच्या आर्थिक संकटावर लवकरच मार्ग काढण्यात येणार आहे.

कुटुंबातील एखाद्या सदस्यासारखे सिएनात माँटे देई पासची बँकेचे स्थान
माँटे देई पासची बँक बंद होण्याची चिन्हे असल्याने अनेक लोक चिंतीत आहेत. ही बँक सोनेरी दिवसांचे स्मरण करून देणारी आहे. या बँकेने अनेकांना रोजगार मिळवून दिला. किंडरगार्टन, रुग्णवाहिका सेवेसह अनेक सुविधा निर्माण करण्यात बँकेची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. स्थानिक इतिहासकार मॉरिजियो बियानचिनी म्हणाले, माँटे देई पासची सिएना शहरातील धमन्यांतून वाहणारे जणू रक्त आहे. ही बँक सिएनातील प्रत्येक कुटुंबातील एखाद्या सदस्यासारखी आहे.

बातम्या आणखी आहेत...