आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • Simply Put, Blown Droplets Stay In The Air For Eight Minutes, Which Is Also A Big Reason For The Outbreak!

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दक्षता बाळगा:सहज बोलताना उडालेले ड्रॉपलेट्स आठ मिनिटे राहतात हवेत, हेदेखील प्रादुर्भावाचे मोठे कारण!

वॉशिंग्टनएका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • संशोधकांनुसार ओरडून बोलल्यास प्रत्येक सेकंदात हजारो ड्रॉपलेट्स निघू शकतात

सहजपणे बोलतानाही श्वासातून निघणारे सूक्ष्म थेंब (रेस्पिरेटरी ड्रॉपलेट्स) हवेत आठ मिनिटे आणि त्यापेक्षाही जास्त वेळ राहू शकतात. कोरोना विषाणू पसरण्याचे हे देखील एक मोठे कारण असू शकते. हा दावा अमेरिकेच्या राष्ट्रीय मधुमेह आणि पाचक व मूत्रपिंड रोग संस्था आणि पेन्सिलवेनिया विद्यापीठाच्या संशोधकांनी अभ्यासात केला आहे. हा अभ्यास प्रोसिडिंग्स आॅफ द नॅशनल अकॅडमी आॅफ सायन्सेसमध्ये प्रकाशित झाला आहे. हे संशोधन एका प्रयोगावर आधारित आहे, ज्यात व्यक्ती बोलत असताना तोंडातून निघणाऱ्या श्वासाच्या लहान थेंबांवर संशोधन करण्यासाठी लेझर लाइटचा वापर करण्यात आला होता. अहवालात म्हटले आहे की, जास्त संवेदनशील लेझर लाइटच्या निरीक्षणातून समजले आहे की, जोराने बोलल्यास दर सेकंदाला हजारो फ्लूइड ड्रॉपलेट्स निघू शकतात. मागील संशोधनात हे दिसून आले होते की, दक्षिण कोरियातील कॉल सेंटरमध्ये कोरोनामुळे अनेक जण बाधित झाले होते. अशीच स्थिती चीनमधील गर्दी असणाऱ्या हॉटेलमधील होती. काही तज्ञांना शंका होती की, अशा ठिकाणी आणि गर्दीच्या कार्यक्रमांमुळे विषाणू लहान वॉरसोलच्या थेंबांद्वारे पसरू शकतो.

अभ्यासात कोरोना किंवा एखाद्या इतर विषाणूचा समावेश करण्यात आलेला नव्हता, तर हे दिसून आले की लोक बोलत असताना कसे रेस्पिरेटरी ड्रॉपलेट्स निर्माण होतात. संशोधकांचे लक्ष लहान ड्रॉपलेट्सवर होते. या रेस्पिरेटरी ड्रॉपलेट्समध्ये संसर्ग प्रसारासाठी पुरेसे कण असू शकतात, असे संशोधकांनी या प्रयोगाच्या आधारे मान्य केले.

मास्क घालत नसलेल्यांना संसर्ग होण्याची जास्त शक्यता : इशारा

संशोधकांचे म्हणणे आहे की, ड्रॉपलेट्समुळेच कोरोना विषाणू पसरतो, असे म्हणता येणार नाही. संशोधनात म्हटले आहे की, यामुळेच जे फेस मास्क घालत नाहीत त्यांची बाधित होण्याची शक्यता जास्त आहे. कारण रेस्पिरेटरी ड्राॅपलेट्समुळे कोरोना पसरू शकतो याकडे दुर्लक्ष करता येणार नाही.

बातम्या आणखी आहेत...