आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Singapore Has Become A Safe Haven For The Rich In India, China, Malaysia And Indonesia; News And Live Updates

दिव्य मराठी विशेष:भारत, चीन, मलेशिया, इंडोनेशियातील श्रीमंतांसाठी सिंगापूर झाला सुरक्षित निवारा; हवाई वाहतूक बंद तरी खासगी जेटने येताहेत लोक

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सिंगल फॅमिली ऑफिस दुप्पट, प्रीमियम गटातील वाहनांच्या विक्रीत 60% वाढ

चीनमधील एका व्यक्तीने ४.६५ कोटी रुपयांची बेंटले कार ऑर्डर केल्याचे फेसबुकवर पाहिल्यानंतर सिंगापूरमधील कार डीलर किथ ओ यांचा विश्वास बसला नाही. त्या व्यक्तीने फक्त किंमत व डिलिव्हरी बाबत विचारले होते. आमच्यासाठी ही लाखो डॉलरची गोष्ट असली तर त्यांच्यासाठी हे किरकोळ असल्याचे किथ सांगतात. सिंगापूरसाठी अशा प्रकारच्या व्यवहाराचा हा नवा ट्रेंड आहे. वर्षभरात विदेशी ग्राहकांमध्ये प्रीमियम गटातील गाड्यांच्या विक्रीत ६०% वाढ झाली आहे. २०२१च्या पहिल्या चार महिन्यांत बेंटले, रॉल्स रॉयस व मर्सिडिजच्या १३०० गाड्या विकल्या गेल्या. ५७ लाख लोकसंख्येच्या भागात हा आकडा धक्कादायक आहे.

खरेदीदारांमध्ये मोठ्या संख्येने चीन, भारत, इंडोनेशिया व मलेशियातील श्रीमंत आहेत. तसेच सेलेटर विमानतळावर हँगर स्पेसची मागणी प्रचंड वाढली आहे. खासगी जेटच्या वैमानिकाने सांगितले की, हवाई वाहतुकीवर प्रतिबंध असल्याने लोक खासगी जेटने येत आहेत. कोरोनाचा आग्नेय आशियावर परिणाम झाला आहे. हाँगकाँगमध्ये राजकीय उलथापालथ सुरू आहे. यामुळे सिंगापूर श्रीमंत व त्यांच्या कुटुंबासाठी सुरक्षित निवारा झाला आहे. संपत्ती व्यवस्थापन फर्म युनियन बँकेअर प्रिव्हीचे स्टीफन रेपको यांच्या नुसार वर्षभरात अनेक विदेशी सिंगापूरमध्ये स्थायिक झाले, अनेक प्रतीक्षेत आहेत.

सिंगल फॅमिली कार्यालयांची संख्या दुप्पट झाली. गुगलचे सर्गेई ब्रिन व चीनचे हेडिलाओ के शू पिंग यांनीही फर्म सुरू केली आहे. मालमत्तेचे दर २०१८ नंतर सर्वाधिक आहेत. स्माइल ग्रुपचे संस्थापक हरीश बहल म्हणतात, वर्षभरात जगभरातील अब्जाधीश सिंगापूरला आले. अनेकांनी पालकांना कोरोनापासून सुरक्षित ठेवण्यासाठी थांबवले आहे.

कोरोनाचे रुग्ण कमी, जास्त लसी; स्वस्त कर्जासारख्या सवलतींचे आकर्षण
इकॉनॉमिक डेव्हलपमेंट बोर्डाचे वरिष्ठ उपाध्यक्ष मॅथ्यू ली सांगतात की, सहज हवाई प्रवास, पालकांसाठी दीर्घ काळाचा परवाना, स्वस्त व्यावसायिक कर्ज, कमी मुद्रांक शुल्क श्रीमंतांना आकर्षित करत आहे. तुमच्याकडे ५०० कोटी रुपयांची मालमत्ता आहे. व्यवसायात १४ कोटींची गुंतवणूक केली तर लगेच नागरिकत्व मिळते. येथे कोरोनाचे रुग्ण खूप कमी आहेत. ३०% लोकांना लस देण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...