आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Sitting For 6 To 8 Hours Increases The Risk Of Heart Attack, Premature Death By 13%; High Risk In India, Bangladesh, Zimbabwe |marathi News

संशोधन:6 ते 8 तास बसून राहिल्याने हृदयाघात, अकाली मृत्यूची जोखीम 13 % नी वाढते; भारत, बांगलादेश, झिम्बाब्वेमध्ये धोका जास्त

ओटावा15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

२१ देशांतील एक लाख नागरिकांवर अलीकडेच झालेल्या एका संशोधनात बैठे काम किती धोकादायक ठरू शकते, हे स्पष्ट झाले. दिवसभरात ६ ते ८ बसून राहिल्यास हृदयाघाताचा धोका वाढतो. अकाली मृत्यूचे प्रमाणही १३ टक्क्यांनी वाढू शकते. जगभरातील गरीब देशांत नोकरीच्या निमित्ताने लोक दिवसभर एकाच स्थितीत बसून काम करतात. म्हणूनच बांगलादेश, भारत, झिम्बाब्वेसारख्या देशात लोक अकाली मृत्यू, हृदयविकाराचे बळी ठरू लागले आहेत. धूम्रपानामुळे होणाऱ्या मृत्युसंख्येपेक्षा ही संख्या थोडी कमी आहे. अमेरिकेत प्रत्येकी पाचपैकी चार जणांचे नोकरीचे स्वरूप शारीरिक कष्टाचे नसते. १९५० ते २०१९ पर्यंत अशा बैठे काम किंवा नोकऱ्यांत ८० टक्क्यांनी वाढ झाली. सायमन फ्रेजर विद्यापीठातील संशोधक स्कॉट लियर म्हणाले, अर्धा तास व्यायाम केला तरी ही जोखीम २ टक्क्यांनी कमी होते.

विकसित देशांत १० %, विकसनशीलमध्ये २५ टक्के
विकसित देशांत दिवसभरात सहा ते आठ तास बैठे काम करतात. त्यामुळे त्यांना जोखीम १० टक्क्यांनी वाढते. विकसनशील देशांत ही जोखीम २५ टक्क्यापर्यंत वाढू शकते. दिवसभरात किमान तासभर तरी व्यायाम केला पाहिजे.

बातम्या आणखी आहेत...