आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकार्यालयीन कामात तासन तास बसून राहणे सामान्य बाब आहे. कार्यालयात काम असो की रिमोट वर्किंग. दीर्घकाळ बसण्याचा परिणाम आपल्या मेंदूवर पडतो. यामुळे स्मृती कमकुवत होते. यामुळे अनेकदा गरजेच्या गोष्टी विसरतात.
प्रौढ व्यक्ती कामादरम्यान ८ तास एकाच जागी हालचाल न करता घालवतात. मात्र, नुकत्याच केलेल्या संशोधनात समोर आले की, अशा लोकांनी दिवसातून ३ तास राहणे आवश्यक आहे. याची दीर्घायुष्यासाठी मदत मिळते. संशोधनानुसार, उभे राहिल्याने रक्तशर्करा पातळी कमी होते. हृदयरोगाची जोखीम कमी होते आणि ८ तास बसून राहणाऱ्यांच्या तुलनेत त्यांची तणाव व थकव्याची जोखीम कमी होते. न्यूयॉर्कच्या ग्लोबल वेलबीइंग लीडचे मायलॉर्ड हॉवेल म्हणाले की, सलग बसून राहिल्यामुळे काळानुरूप मानसिक आरोग्य आणि स्मरणशक्तीवर नकारात्मक परिणाम पडतो.
उभे राहिल्यास न्यूरल एजिंगच्या मुद्यांशी लढण्यात मदत मिळू शकते. उदा. मेडियल टेम्पोरल लोब बिघडणे, हा मेंदचा असा भाग आहे,ज्यात स्मरणशक्ती असते. याशिवाय दीर्घकाळ बसल्यावर शरीराच्या सर्व भागांतील रक्तपुरवठ्यावर परिणाम होतो. मेंदूला रक्तपुरवठा सुरळीत न झाल्याने मेंदूच्या पेशींना ऑक्सिजन व पोषक तत्वांची कमतरता भासते. दीर्घकाळ एके ठिकाणी बसल्यावर या पूर्ण प्रक्रियेवर परिणाम होतो. याचा परिणाम आपल्या पायांवरही होतो. एकाच स्थितीत बसल्यास पायाला अपंगत्व येऊ शकते.
कामादरम्यान अर्ध्या तासात २ मिनिटे उठून फिरा
मेंदूच्या आरोग्यासाठी व्यक्तीने दर अर्ध्या तासाला २ मिनिटे उठून थोडे फिरणे गरचेचे आहे. तसे केल्यास मेंदूला रक्तपुरवठा वाढतो. यामुळे वस्तू ओळखण्यास मेंदूला मदत मिळत असते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.