आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओमायक्रॉनची धास्ती:भारतात 'डेल्टा'मुळे गतवर्षी निर्माण झालेली परिस्थिती पुन्हा उद्भवू शकते : संयुक्त राष्ट्र

9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात असे म्हटले आहे की, भारतात एप्रिल ते जून 2021 दरम्यान, कोविड-19 च्या डेल्टा स्वरूपाच्या घातक लाटेने 2,40,000 लोकांचा बळी घेतला तसेच अर्थचक्रामध्ये अडथळा आणला आणि नजीकच्या भविष्यात अशीच परिस्थिती उद्भवू शकते.

युनायटेड नेशन्स वर्ल्ड इकॉनॉमिक सिच्युएशन अँड प्रॉस्पेक्ट्स (WESP) 2022 च्या अहवालात असेही म्हटले आहे की, कोविड-19 च्या अत्यंत संक्रामक ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या संसर्गाच्या नवीन लाटेमुळे मृतांची संख्या आणि आर्थिक नुकसान पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.

'भारतात, डेल्टा-व्हेरिएंटच्या संसर्गाच्या प्राणघातक लाटेमुळे एप्रिल ते जून दरम्यान 240,000 लोकांचा मृत्यू झाला आणि आर्थिक पुनर्प्राप्तीमध्ये अडथळा निर्माण झाला,” असे अहवालात म्हटले आहे. नजीकच्या काळात अशीच परिस्थिती उद्भवू शकते.

बातम्या आणखी आहेत...