आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Sixty Countries, Including The United States, Cut Off Financial Aid To Afghanistan, With Only China Backing It

तालिबानला मोठा झटका:अमेरिकेसह 60 देशांनी अफगाणिस्तानला मिळणारी आर्थिक मदत थांबवली, फक्त चीनने पाठिंबा दिला

काबुल2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अफगाणिस्तानवर कब्जा केलेल्या तालिबानला अमेरिकेसह 60 देशांनी मोठा झटका दिला आहे. या देशांनी अफगाणिस्तानला दरवर्षी मिळणारी अब्जावधी डॉलरची मदत थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, चीन तालिबानच्या समर्थनासाठी पुढे आला आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिन यांनी अमेरिकेवर निशाणा साधला आणि म्हणाले - अफगाणिस्तानमधील बिघडलेल्या परिस्थितीला फक्त अमेरिकाच जबाबदार आहे.

अमेरिकेवर आरोप
वेनबिन म्हणाले - अमेरिका या स्थितीत अफगाणिस्तान सोडून परत जाऊ शकत नाही. युद्धसदृश परिस्थितीचा सामना करणाऱ्या अफगाणिस्तानला बळकटी देण्यासाठी चीन आवश्यक पावले उचलेल. तालिबानच्या कब्ज्यानंतर अमेरिकेच्या बँकांमधील अफगाण सरकारची खाती सील करण्यात आली आहेत. याशिवाय, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) अफगाणिस्तानला $ 460 दशलक्ष परत घेण्यासही बंदी घातली आहे.

अमेरिकेच्या बँकेत जमा आहेत अफगाणिस्तानचे पैसे
अफगाणिस्तान सेंट्रल बँकेच्या 9 अब्ज डॉलरच्या परकीय साठ्यापैकी सुमारे 7 अब्ज डॉलर न्यूयॉर्कच्या फेडरल रिझर्व्ह बँकेकडे आहेत. बायडन प्रशासनाने हे पैसे आधीच जप्त केले आहेत. उर्वरित पैसाही तालिबानांपर्यंत पोहोचू नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत. पुढील चार वर्षांपर्यंत अफगाणिस्तानला 12 अब्ज डॉलर्स देण्याचा करार 60 हून अधिक देशांनी नोव्हेंबरमध्ये केला होता. आता हे पैसे मिळणेही कठीण दिसत आहे.

बातम्या आणखी आहेत...