आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संशोधन:अमेरिकेत 13 भारतीय वंशाच्या अमेरिकींना स्लाेन फेलोशिप; गेल्या वर्षी सात निवडले

छत्रपती संभाजीनगर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेत वैज्ञानिक संशोधन आणि नवोन्मेषासाठी दिल्या जाणाऱ्या फेलोशिपमध्ये भारतीय वंशाच्या अमेरिकी शास्त्रज्ञांची संख्या वाढत आहे.अमेरिकेच्या प्रतिष्ठित स्लोन फेलोशिपसाठी या वर्षी निवडलेल्या १२५ शास्त्रज्ञांपैकी १३ भारतीय वंशाचे आहेत. त्यांची निवड २० हजार असामान्य अमेरिकी शास्त्रज्ञांनी केली आहे. त्यांच्या संशोधन आणि नवोन्मेषाला अमेरिकी सरकार आणि गुगल, अॅमेझॉन, टोयोटा रिसर्च सेंटरसारख्या कंपन्यांनी मान्यता दिली आहे. यामध्ये तीन- सुशांत सचदेवा, भार्गव नारायणन, शमा मल्लिकार्जुन शारदा यांनी भारतीय तंत्रज्ञान संस्थेतून बीटके केले. फेलो अनिरुद्ध मजूमदार यांचाही त्यात समावेश आहे. त्यांनी प्रिन्सटन युनिव्हर्सिटीमध्ये इंटेलिजन्स रोबो मोशन लॅबची स्थापना केली आहे. ते तेथे अध्यापनही करतात. ही प्रयोगशाळा जटील स्थितीत काम करणारे ड्रोन आणि रोबो तयार करते. एक अन्य शास्त्रज्ञ तृप्ती पांडे यांचे संशोधन हवामान बदल वेगवेगळ्या प्रकारच्या भौगोलिक ठिकाणी पावसावर कसा परिणाम करतो यावर केंद्रीत आहे. अल्फ्रेड पी. स्लोन फाउंडशेनचे अध्यक्ष अॅडम एफ फाल्क यांनी या फेलोचे कौतुक केले आहे. २०२१ मध्ये ४ व २०२२ मध्ये मूळ भारतीय शास्त्रज्ञांची निवड झाली होती.

या वर्षी निवडलेले भारतवंशीय अमेरिकी फेलो व त्यांच्या संस्था शमा मल्लिकार्जुन शारदा, साउथ कॅलिफाेर्निया युनिव्हर्सिटी आणि सौरभ एस. चिटणीस, डलहौसी युनिव्हर्सिटी (रसायनशास्त्र), अनिरुद्ध मजूमदार, प्रिन्सटन युनिव्हर्सिटी , सुशांत सचदेवा, टोरंटो युनिव्हर्सिटी , ईशान चट्टोपाध्याय, कॉर्नेल युनिव्हर्सिटी आणि रश्मी विनायक, कार्नेगी मेलॉन युनिव्हर्सिटी (कॉम्प्यूटर सायन्स); तृप्ति भट्टाचार्य, सिरॅक्यूज युनिव्हर्सिटी (पृथ्वी विज्ञान); मानसी देशपांडे, शिकागो युनिव्हर्सिटी (अर्थशास्त्र); भार्गव नारायणन, रतगर्स (गणित); मुबारक हुसेन सैयद, न्यू मैक्सिको युनिव्हर्सिटी (मज्जातंतू शास्त्र); देबनजन चौधरी, कॉर्नेल युनिव्हर्सिटी; तेजस्वी वेणुमाधव नेरेला व सागर विजय, कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटी, सांता बारबरा (भौतिकशास्­त्र).

२० हजारांमध्ये १२५ ची निवड ड़२५ फेलोशिप स्लॉटसाठी दरवर्षी २०,००० हून जास्त संशोधकांना नामनिर्देशित केले जाते. फेलो विजेत्यांसाठी ७५,००० डॉलरची(६०.६६ लाख रु.) फेलोशिप मिळते. त्याचा वापर फेलोचे संशोधन पुढे नेण्यासाठी लवचिक पद्धतीने केला जाऊ शकतो. या वेळी भारतीय शास्त्रज्ञांना एकूण ९.७५ लाख डॉलर(७.९७ कोटी रुपये) मिळतील.

स्वत: नाही करू शकत नामांकन स्लोन रिसर्च फेलोशिप शास्त्रज्ञ वैज्ञानिक समुदायासोबत नजीकच्या समन्वयातून दिली जाते. ५४ संस्थांना वेगवेगळ्या श्रेणीतून पाठवली जातात. फेलोसाठी उमेदवारांना त्यांचे सहकारी शास्त्रज्ञच नामांकित करू शकतात. विजेत्यांची निवड संशोधनातील यश, सृजनशीलता आणि त्यांच्या क्षेत्रात अग्रणी बनवण्याच्या क्षमतेच्या आधारावर स्वतंत्र पॅनलद्वारे केली जाते.

बातम्या आणखी आहेत...