आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमेरिका, ब्रिटन आणि चीनच्या संशोधकांनी एकत्र येऊन अनोखी स्मार्ट काँटॅक्ट लेन्सची निर्मिती केली आहे. तिचे वैशिष्ट्य म्हणजे, ही लेन्स घातल्यानंतर तुम्ही मधुमेह आणि हृदयविकारांवर लक्ष ठेवू शकाल. ही लेन्स अश्रूंच्या मदतीने शरीरातील रक्त शर्करेेचे (ब्लड शुगर) प्रमाण तपासेल तसेच तुम्हाला अलर्टही करेल. लेन्स तयार करणाऱ्या टीमचे सदस्य प्रो. यूनलॉन्ग झाओ म्हणाले, ही लेन्स डोळ्यांचे तेज वाढवण्यासोबतच स्वत:ला निरोगी राखण्यातही मदत करते. लेन्स अश्रूंतील ब्लड शुगरची पातळी तपासते. यानंतर त्याचा डेटा वायरलेस पद्धतीने कॉम्प्युटरमध्ये ट्रान्सफर करते. त्या व्यक्तीला मधुमेह आणि हृदयविकाराचा किती धोका आहे, हे कॉम्प्युटरमधील डाटा पाहून सांगता येऊ शकते. हाॅर्वर्ड विद्यापीठाचे प्रो. शिकी गुओ म्हणाले की, आमची लेन्स इतर स्मार्ट लेन्सच्या तुलनेत खूप पातळ आहे. दोन लेन्सच्या मध्यभागी एक सेन्सर व सर्किट बसवले आहे.
डोळ्यांतील तरल पदार्थ या सेन्सर्सच्या संपर्कमध्ये येताच नवी माहिती मिळते. या लेन्समध्ये काही सेन्सर्स व मायक्रोचिप लावलेली आहेत. ती पापण्यांचा वेग ओळखून त्यानुसार काम करतात. इतकेच नव्हे तर ही लेन्स झूम इन व झूम आऊटचीही सुविधा देते. संशोधकांनुसार, तुुम्हाला एखादी गोष्ट झूम करून पाहायची असेल तर त्यासाठी फक्त एकदा पापण्यांची उघडझाप करावी लागेल. विशेष म्हणजे, लेन्समध्ये अनेक गोष्टी असूनही ती तुम्हाच्या डोळ्यांना खुपत नाही. दरम्यान, कॅलिफोर्नियातील मोजो व्हिजन स्टार्टअपने वर्षअखेरपर्यंत आपल्या स्मार्ट काँटॅक्ट लेन्सचे प्रोटोटाइप बाजारात लाँच करण्याची घोषणा केली आहे. या लेन्सची माहिती सीईएस २०२० मध्ये जारी केली होती. ही लेन्स वेळ, हवामानाचा अंदाज आणि कॅलेंडरचीही माहिती देते.
यात नाइट व्हिजनचीही सुविधा, रोबोटिक डाेळ्यांप्रमाणेच करणार काम
ही स्मार्ट लेन्स कमजोर नजरेच्या लाेकांसाठी उपयोगी हाेण्यासोबतच रोबोटिक डोळ्यांप्रमाणे काम करेल. संशाेधकांनुसार, लेन्समध्ये नाइट व्हिजनचीही सुविधा आहे. त्याच्या वापरासाठी स्मार्टफोन किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या उपकरणाची गरज नसेल. कारण की त्यात इनबिल्ट डिस्प्ले बसवण्यात आला आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.