आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Sneha Dubey India Pakistan | India Junior Diplomat Sneha Dubey Reply To Pakistan PM Imran Khan At United Nations; News And Live Updates

पाक पीएमवर भारी पडल्या भारताच्या महिला अधिकारी:काश्मीर रोषावर पाकिस्तानच्या पंतप्रधानांना प्रत्युत्तर - दहशतवाद्यांचे पालनपोषण करता, लादेनला शहीद म्हणता; काश्मीरची स्वप्ने सोडून द्या

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • इम्रान खानला स्नेहाने काय उत्तर दिले?

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेला संबोधित करताना काश्मीरबाबत रोष व्यक्त केला. दक्षिण आशियातील कायमस्वरूपी शांतता जम्मू-काश्मीर वादाच्या निराकरणावर अवलंबून असल्याचे इम्रान खान म्हणाले. पाकिस्तान पंतप्रधानांच्या या विधानाला भारताच्या एका कनिष्ठ अधिकाऱ्याने चोख प्रत्युत्तर दिले आहे.

भारताच्या यूएनमधील सचिव स्नेहा दुबेने संयुक्त राष्ट्रामध्ये इम्रान खान यांच्यावर जबरदस्त पलटवार केला. या पलटवाराचा भारतात प्रत्येकजण कौतूक करत आहे. विशेष म्हणजे त्यांच्या या पलटवारानंतर नारी शक्ती हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे.

इम्रान खानला स्नेहाने काय उत्तर दिले?
यूएनमधील भारतीय सचिव स्नेहा दुबे म्हणाल्या की, दहशतवाद्यांना प्रोत्साहन आणि मदत करण्याचा पाकिस्तानचा इतिहास असल्याचे संयुक्त राष्ट्राच्या सदस्य देशांना माहित आहे. विशेष म्हणजे याचा पाकिस्तानच्या धोरणातदेखील समावेश आहे. पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठाचा वापर नेहमीच भारताविरोधात खोटे बोलण्यासाठी आणि जगाचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी केला आहे. ही पाकिस्तानची पहिलीच वेळ नाही. दहशतवादी पाकिस्तानात मुक्तपणे फिरत असून ओसामा बिन लादेनलाही पाकिस्तानने आश्रय दिला होता. पाकिस्तान ओसामा बिन लादेला आपल्या देशात शहीद म्हणून उल्लेख करतो असा टोला दुबे यांनी लगावला आहे.

काय म्हणाले होते इम्रान खान?
संयुक्त राष्ट्र महासभेला संबोधित करताना इम्रान खान यांनी भारतावर काही गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले की, अमेरिकेत 9/11 च्या हल्ल्यानंतर जगभरातील उजव्या विचारसरणीने मुस्लिमांवर हल्ले करण्यास सुरुवात केली. याचा सर्वात मोठा प्रभाव भारत देशात पाहायला मिळाला. भारतामध्ये आरएसएस आणि भाजप मुस्लिमांना लक्ष्य करत आहे. मुस्लिमांमध्ये भेदभाव केला जात आहे. भारताने एकतर्फी पावले उचलत जबरदस्तीने काश्मीरवर कब्जा केल्याचा आरोपही इम्रान खांनी केला आहे.

स्नेहा दुबे संयुक्त राष्ट्रात भारताच्या पहिल्या सचिव आहेत.
स्नेहा दुबे संयुक्त राष्ट्रात भारताच्या पहिल्या सचिव आहेत.

कोण आहेत स्नेहा दुबे?
स्नेहा दुबे 2012 च्या बॅचच्या IFS अधिकारी आहेत. ती गोव्यात मोठी झाली असून तिचे शालेय शिक्षणदेखील गोव्यातच झाले आहे. यानंतर, तीने आपले उच्च शिक्षण पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून आणि नंतर जेएनयू दिल्ली येथून एमफिल पूर्ण केले. स्नेहा हीने 2011 मध्ये पहिल्याच प्रयत्नात नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली होती. त्यानंतर त्यांची पहिली नियुक्ती परराष्ट्र मंत्रालयात झाली. नंतर 2014 मध्ये त्यांना माद्रिद येथील भारतीय दूतावासात पाठवण्यात आले. सध्या ती संयुक्त राष्ट्रामध्ये भारताच्या पहिल्या सचिव आहेत.

बातम्या आणखी आहेत...