आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमेरिका:20 राज्यांत बर्फवृष्टी; न्यूयाॅर्क, न्यूजर्सीत आणीबाणी, 10 वर्षांतील भयंकर हिमवादळ ‘ऑर्लेना’

वाॅशिंग्टन3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेला साेमवारी १० वर्षांतील सर्वात भयंकर बर्फाच्या वादळाचा तडाखा बसला. सुमारे २० राज्यांत बर्फवृष्टी झाली. न्यूयाॅर्क, न्यूजर्सी, फिलाडेल्फियामध्ये दाेन फूट बर्फ साचला हाेता. त्यामुळे येथे थंडीच्या कडाक्यात वाढ झाली आणि आणीबाणी जाहीर करण्यात आली. वाॅशिंग्टन व बाेस्टनमध्ये १० इंचांहून जास्त बर्फवृष्टी झाली. स्थानिक माध्यमानुसार हिमवृष्टीमुळे ४०० रस्ते अपघात झाले. ३०० हून जास्त वाहने रस्त्यांत अडकली आहेत.

दुसरीकडे खराब हवामानानुसार १ हजारहून जास्त विमान उड्डाणे रद्द करण्यात आली. न्यूयाॅर्क विमान प्राधिकरणाला ८१ टक्क्यांपर्यंत उड्डाणे रद्द करावी लागली. वादळामुळे मंगळवारी जाेरदार बर्फवृष्टी हाेण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...